शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

जुलैतही सरासरी एवढाच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात जून महिन्यात सहा दिवस कोसळलेल्या पावसामुळे जुलै महिन्यातील पावसाबाबत तर्कविर्तक लावले जात आहेत़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात जून महिन्यात सहा दिवस कोसळलेल्या पावसामुळे जुलै महिन्यातील पावसाबाबत तर्कविर्तक लावले जात आहेत़ या तर्कांना येत्य चार दिवसात पूर्णविराम मिळण्याची शक्यता असून अरबी समुद्रात बाष्पयुक्त वाऱ्यांची निर्मिती वेगाने होत असल्याने जिल्ह्यात चार दिवसात समाधानकारक पाऊस येण्याची शक्यता आहे़जून महिन्यात केवळ ७४ मिलीमीटर पावसाने हजेरी लावली आहे़ हा पाऊस पेरणी योग्य असल्याने शेतशिवारात ७० टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ जूनमध्ये पावसाचे दिवस कमी असल्याने जुलै मधील पावसावर शेतकऱ्यांची भिस्त आहे़ यात आतापर्यंत ११ दिवसही कोरडे गेले असल्याने शेतकºयांच्या चिंता वाढल्या आहेत़ परंतु ही चिंता दूर होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दर्शवली आहे़ जून महिन्यात धडकणारा मॉन्सून हिमालयाकडे गेला असल्याने वातावरणीय बदलांना सुरूवात झाली आहे़ यातच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात एकाच वेळी बाष्पयुक्त वाºयांच्या निर्मितीचा वेग वाढत असल्याचे हवामान खात्याच्या निदर्शनास आले आहे़ हे वारे १४ ते १७ जुलै पर्यंत राज्यात धडकणार आहेत़ यातून नंदुरबार जिल्ह्यात १७ जुलैपासून पाऊस होण्याची शक्यता आहे़ हा पाऊस किमान ३१ जुलैपर्यंत राहणार असल्याने महिनाअखेरपर्यंत सरासरी १०८ मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता आहे़दरम्यान १ ते ११ जुलै दरम्यान आतापर्यंत ३३ मिलीमीटर तर जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या १५५ पैकी ७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे़ पावसाची नोंद झाली असली तरीही १ जून ते ११ जुलै या काळात कोरड्या दिवसांची संख्याही अधिक आहे़ तब्बल ४१ दिवसांच्या या काळात जून महिन्यातील १० तर गेल्या १० दिवसातील दोन दिवस पाऊस झाला आहे़येत्या ३१ जुलैपर्यंत पाऊस येणार असल्याने कोरडे दिवस कमी होणार आहेत़ यातून पीक संगोपनासाठी शेतकºयांना जमिनीत ओल मिळणार असून पीकांचे होणारे नुकसान आणि दुबारपेरणीचे संकट टळेल अशी अपेक्षा हवामान तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे़

जून २०१९ ते जुलै २०१९ या ६१ दिवसांच्या कालावधीत ३२ दिवस कोरडे गेले होते़ १ ते ११ जून दरम्यान ११ दिवस, १४ त २३ जून दरम्यान १० दिवस तर ९ ते १८ जुलै दरम्यान ११ दिवस पाऊस नव्हता़ तालुकानिहाय सरासरी पाहिल्यास गेल्या वर्षाची स्थिती यंदाच्या जून महिन्यासारखीच असल्याचे स्पष्ट होत आहे़जिल्ह्यात २०१९ मध्ये जुलै ते आॅक्टोबर या काळात धो-धो पाऊस बरसला होता़ यात अतीवृष्टीसारखी गंभीर स्थिती अनुभवण्यास आली होती़ मात्र जून २०१९ मध्ये केवळ ४९़२ मिलीमीटर पाऊस झाला़ सहा दिवस पाऊस तर २५ दिवस हे कोरडे होते़ हीच गत जून २०२० मध्ये आहे़ १ ते ३० जून दरम्यान ७४ मिलीमीटर पाऊस झाला असून हा पाऊस केवळ १० दिवस झाला आहे़ गेल्या वर्षात जुलै महिन्यात १५ दिवस जिल्ह्याच्या विविध भागात २८७ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती़

नंदुरबार तालुक्यात जून महिन्यात सरासरी १५३ मिलीमीटर पाऊस कोसळतो़ ३० जूनपर्यंत तालुक्यात ७४ मिलीमीटर पाऊस झाला आहे़ नवापूर तालुक्यात १ ते ३० जूनदरम्यान ५८, शहादा १०८, तळोदा ८६, धडगाव ५७ तर अक्कलकुवा तालुक्यात ५६ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे़ जिल्ह्यातील सर्व ३६ मंडळात कृषी विभाग आणि हवामान खात्याने लावलेल्या पर्जन्यमापकात या पावसाची नोंद करण्यात आली आहे़ मंडळनिहाय आढावा घेतल्यास प्रत्येक मंडळात ६ ते ११ दिवस पाऊस झाला आहे़ तळोदा मंडळात १२ दिवस तर तोरणमाळ मंडळात जून महिन्यात ११ दिवस पाऊस कोसळला आहे़ शहादा तालुक्यात १० मंडळात ६ ते ७ दिवस पावसाच्या नोंदी आहेत़