आठ रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या अहवालाकडे लागले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:00 PM2020-05-23T12:00:03+5:302020-05-23T12:00:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार व रजाळे येथे नव्याने आढळलेल्या आठ कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील ४२ जणांचे स्वॅब ...

 Attention was drawn to the reports of individuals in contact with eight patients | आठ रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या अहवालाकडे लागले लक्ष

आठ रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या अहवालाकडे लागले लक्ष

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार व रजाळे येथे नव्याने आढळलेल्या आठ कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील ४२ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल शनिवारी सायंकाळपर्यंत अपेक्षीत आहे. एकाच कुटूंबातील सहा जण बाधीत असल्याने या कुटूंबातील आणखी इतर जणांच्या स्वॅबचा रिपोर्ट काय येतो याकडे आता लक्ष लागून आहे. दरम्यान, सिव्हीलमधील दोन कर्मचारी बाधीत झाल्याने येथेही मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली जात आहे.
रजाळे येथील एकाच कुटूंबातील सहाजण कोरोना बाधीत आढळले. या कुटूंबाच्या संपर्कातील आणि त्यांच्याच परिवारातील इतर सदस्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या सहा सदस्यांच्या संपर्कातील आणि सिव्हीलमधील दोन कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. त्यांचे स्वॅब घेवून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
रजाळेतील भिती कायम
रजाळे येथील ग्रामस्थांमध्ये भिती कायम आहे. पॉझिटिव्ह असलेल्या या परिवारातील अनेकजण इतर ठिकाणी गेले आहेत. गावात देखील ठिकठिकाणी त्यांचा संपर्क आलेला आहे. त्यामुळे अशा संपर्कातील लोकांची भिती वाढली आहे. त्यांच्या स्वॅब रिपोर्टकडे आता लक्ष लागून आहे.
गावात ध्यानीमनी नसतांना कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, त्यानंतर त्याच कुटूंबातील इतर पाच रुग्ण आढळले. गावातील लोकांनी लॉकडाऊनच्या काळात आवश्यक ती सर्व खबरदारी घेतलेली होती. परंतु मुंबई रिटर्न या परिवारामुळे गावात कोरोनाने शिरकाव केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सर्व व्यवसाय बंद आहेत. लॉकडाऊनचे संपुर्ण पालन केले जात आहे. गावात बाहेरील कुठल्याही व्यक्तीला येवू दिले जात नाही.
आरोग्य विभागातर्फे सर्व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. वेळोवेळी निर्जंंतुकीकरण देखील केले जात आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर गावावर हे संकट ओढावल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. तरीही आलेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आणि गावातून कोरोना हद्दपार करण्यासाठी गावकऱ्यांनी संकल्प केला आहे.
नंदुरबारातील भोईगल्ली सील
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या भोई गल्लीतील अनेक भाग सील करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधीत एक कर्मचारी या भागात राहतात. त्यामुळे हा परिसर निर्जूंतुकीकरण करून सील करण्यात आला आहे. हे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. मुख्य रस्ता आणि इतर गल्लीबोळात बॅरीकेटींग लावण्यात आले आहे.
संबधीत रुग्णाच्या संपर्कातील लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. हा भाग बाजार पट्टयातील असल्यामुळे व्यावसायिकांना देखील आता प्रतिबंधीत क्षेत्र असल्यामुळे व्यवसाय करता येणार नसल्याची स्थिती आहे.

 

Web Title:  Attention was drawn to the reports of individuals in contact with eight patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.