पतसंस्था कार्यालयात चोरीचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:49 PM2020-01-16T12:49:23+5:302020-01-16T12:49:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील ब्राम्हणवाडी परिसरातील एका पतसंस्थेचे कार्यालय मध्यरात्री चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु या भागातील ...

Attempts to steal money at the credit office | पतसंस्था कार्यालयात चोरीचा प्रयत्न फसला

पतसंस्था कार्यालयात चोरीचा प्रयत्न फसला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील ब्राम्हणवाडी परिसरातील एका पतसंस्थेचे कार्यालय मध्यरात्री चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु या भागातील नागरिकांच्या सजगतेमुळे चोरट्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. दरम्यान, गणपती मंदीर परिसरातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. याबाबत बुधवारी सायंकाळी उशीरापर्यंत पोलिसात नोंद नव्हती.
नंदुरबारातील ब्राम्हणवाडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. पतसंस्थेच्या दरवाजाजवळ जोराने ठोकण्याचा आवाज येत असल्यामुळे या परिसरात राहणारे रमेश व मनोज जैन यांनी घराबाहेर येवून कानोसा घेतला. त्यांना दोन ते तीनजण दरवाजा तोडतांना दिसले. त्यांनी लागलीच आरडाओरड केली असता तेथून दोन ते तीनजण पसार झाले. नगरसेवक चारूदत्त कळवणकर यांना परिसरातील नागरिकांनी माहिती दिल्यावर त्यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधला. निरिक्षक अरविंद पाटील यांनी लागलीच पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परिसर पिंजून काढला, मात्र उपयोग झाला नाही. सकाळी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी धुंडाळून काढले असता गणपती मंदीर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये तीन चोरटे पळतांना दिसून आले. तिन्हीजण युवक असून त्यांनी मंगळबाजाराकडे धूम ठोकल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. त्यांच्या पेहराव आणि शरिरयष्टीवरून पोलिसांनी त्यांचा माग काढण्यास सुुरुवात केली आहे.
दरम्यान, पतसंस्थेचे व्यवस्थापक विनोद जैन यांनी सांगितले, कार्यालयात रोख रक्कम नव्हती. दैनंदिन ठेव व इतर रक्कम वेळीच बँक खात्यात जमा केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पतंस्थेच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा चोरट्यांनी तोडलेला होता. जैन बंधूंना जाग आली नसती तर चोरट्यांनी परिसरातील इतर घरांकडेही मोर्चा वळविला असता असे बोलले जात आहे.
याबाबत सायंकाळी उशीरापर्यंत या घटनेसंदर्भात पोलिसात कुठलीही नोंद झालेली नव्हती.
दरम्यान, भर वस्तीत चोरट्यांनी घातलेल्या धुमाकूळमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करावा व नियमित गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.

Web Title: Attempts to steal money at the credit office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.