लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील गजबजलेल्या अमृत चौकातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली. २७ रोजी रात्री ही घटना घडली.सुरेश मकडू भिल, रा.बंधारहट्टी, नंदुरबार असे संशयीताचे नाव आहे. नंदुरबारातील मध्यवर्ती असलेल्या अमृत चौकात बँक आॅफ इंडिया आहे. बँकेच्या बाजुलाच एटीएम आहे. २७ रोजी रात्री साडेनऊ ते एक वाजेच्या दरम्यान सुरेश भिल याने एटीएममध्ये प्रवेश करून चावी व तारेच्या सहाय्याने एटीएमचे लॉक उघडण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्हीमध्ये चोरट्याच्या सर्व हालचाली कैद झाल्या आहेत.याबाबत बँकेच्या अधिकारी मनिषा अशोक गायकवाड यांनी फिर्याद दिल्याने सुरेश भिल याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास हवालदार संदीप गोसावी करीत आहे.दरम्यान, भर चौकातील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
नंदुरबारात एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:32 IST