नंदुरबार,दि.11- तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन क्रमांक चार येथे महिलेवर एकाने अतिप्रसंग केल्याची घटना घडली़ सोमवारी दुपारी ही घटना घडली़
रोझवा पुनर्वसन क्रमांक 4 येथील महिला सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गावापासून जवळच असलेल्या तिच्या शेतातील झोपडीत कामे आवरत होती़ महिला एकटी असल्याचे पाहून, कालूसिंग राघो पावरा (रा़ रोझवा पुनर्वसन क्रमांक चार) याने तिला ओढून घेत तिच्यावर अतिप्रसंग केला व त्याठिकाणाहून पळ काढला, पिडीत महिलेने ही बाब पती व ग्रामस्थांना सांगितल्यानंतर हा प्रकार उजेडात आला़ या घटनेनंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास पिडित महिलेच्या फिर्यादीवरून कालुसिंग राघो पावरा याच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े