लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जर्ली ता़ धडगाव येथील एकाने अल्पवयीन युवतीला विवाहाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह़े याप्रकरणी युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल आह़े धडगाव तालुक्यातील जर्ली येथील अनिल वनकर पावरा याने परिसरातील एका अल्पवयीन युवतीला 15 जून रोजी पळवून नेले होत़े धवळीविहिर ता़ तळोदा येथे युवतीस घेऊन गेल्यानंतर त्याठिकाणी तसेच 17 जून रोजी जर्ली येथील घरी परत आणून तिच्या इच्छेविरोधात शारिरिक संबध ठेवले होत़े युवतीने नकार दिल्यानंतर तिला संशयिताने घरात डांबून ठेवले होत़े युवतीच्या कुटूंबियांना ही माहिती समजून आल्यानंतर त्यांनी युवतीची सुटका केली़ याप्रकरणी मंगळवारी पहाटे युवतीने धडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित अनिल पावरा याच्याविरोधात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 सह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मोरे करत आहेत़
विवाहाचे अमिष देऊन अल्पवयीन युवतीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 12:36 IST