लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : साधारण ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच हजारो किलोमीटरचा प्रवास करत तोरणमाळ परिसरातील तलावासह तालुक्यातील विविध साठवण तलावांवर हजेरी लावणारे परदेशी पक्षी यंदाच्या सतत बदलत्या हवामानमुळे अद्यापही दिसेनासे झाले आहे. त्यामुळे यावर्षी त्यांचे आगमन लांबणीवर पडल्याचे पक्षीमित्रांकडून बोलले जात आहे. या पक्ष्यांचा या परिसरात पाच महिने मुक्काम असतो.हिवाळ्याच्या सुरूवातीलाच विविध देशातूून फ्लोमींगो, चक्रवाक, रंगीत कारकोचे, स्पुनबील, हळदी-कुंकू बदक यासारखे विविध पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करीत धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथील तलावावर दरवर्षी येतात. येथील सिताखाई पॉईंट, यशवंत तलाव, कमळ तलाव, मच्छिंद्रनाथाची गुहा, धबधबे ही ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात. यासोबतच विविध जातीचे पक्षी पहायला मिळत असल्याने पर्यटकांचे आकर्षण वाढते. या ठिकाणासह परिसरातील अनेक लहान-मोठे पाझर तलावावर साधारण मार्च महिन्यार्पयत त्यांचा मुक्काम आढळून येतो. परंतु यावर्षी अनेक लहान-मोठे पाझर तलाव, धरण भरलेले असतानाही सतत बदलणा:या हवामानामुळे परदेशी पाहुण्यांचे आगमन लांबणीवर पडले आहे.विदेशी पक्षी धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथील तलावासह परिसरातील असलेल्या छोटय़ा-मोठय़ा धरणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गर्दी करीत असतात. विशेष म्हणजे पाच महिने हे परदेशी पाहुणे तलाव परिसरात वास्तव्य करतात. त्यानंतर मार्च महिन्यात हे पक्षी परतीचा प्रवास करीत असल्याचे पक्षी अभ्यासकांनी सांगितले.
परदेशी पक्ष्यांचे आगमन लांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:48 IST