शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात नाचण्याच्या वादातून शहाद्यात हाणामारी, १३ जणांना अटक

By मनोज शेलार | Updated: April 26, 2023 18:09 IST

लग्नात नाचताना धक्का लागला या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली.

नंदुरबार : लग्नात नाचताना धक्का लागला या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारी लाठ्याकाठ्यांचा उपयोग करण्यात आल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला याप्रकरणी १३ संशयितांना अटक केली आहे.

शहरातील टेक भिलाटी परिसरात मंगळवारी लग्न होते. या लग्नासाठी मोठ्या प्रमाणात नातेवाईक मंडळी जमली होती. लग्नासाठी बॅन्ड आणण्यात आला होता. शहरातील अब्दुल हमीद चौकात लग्नाची वरात आली असताना बॅन्डच्या तालावर वऱ्हाडी मंडळी सह नातेवाईक नाचत असताना एकाचा धक्का दुसऱ्याला लागला. यावरून सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाल्यानंतर परिसरात पळापळ झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केले. पोलिसांनी यानंतर लागलीच कारवाईला सुरुवात करत मंगळवारी रात्री उशिरा चार संशयितांना अटक केली होती. तर बुधवारी सकाळी उर्वरित नऊ संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले.रात्री दोन वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पोलिस ठाण्यावर जबाब जमला होता पोलिसांनी जमावाला पांगविले घटना घडली त्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

याप्रकरणी शहादा पोलिसात पोलिस कर्मचारी दिनकर रामा चव्हाण यांच्या फिर्यादीवरून जाकीर शाबीर पठाण (४०), मोईन पिंजारी (३५), मोना (३२), बिलाल सत्तार मिस्तरी (३३), नविद खान (४३), सद्दाम (४१), परेश गोरख पवार (३७), कार्तिक दिलीप नाईक (२४), वेडू कुवर (३७), पप्पू सामुद्रे (३१), सुलतान शाह (२७), सुलतान कुरेशी (२९), समीर शहा (२४) सर्व रा. शहादा व इतर ५ ते ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक माया राजपूत करीत आहेत. 

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारCrime Newsगुन्हेगारीArrestअटक