जिल्ह्यातील वीज थकबाकीच्या वसुलीसाठी सध्या पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती वीज वितरण कंपनीकडून देण्यात येत आहे. जिल्ह्यात घरगुती वीज बिलांच्या वसुलीसाठी शहादा व नंदुरबार अशा दोन विभागांतून अधिकारी व कर्मचारी सातत्याने नागरिकांच्या भेटी घेत आहेत. लाॅकडाऊन काळात बिल न भरू शकलेल्यांना ऑनलाइन पद्धतीने बिल भरण्याबाबत सूचित केले जात आहे. दरम्यान जिल्ह्यातील ५५ हजार ५०७ कृषिपंप ग्राहकांकडे सद्य:स्थितीत ७४५ कोटी ३१ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण २५८ कोटी ८० लाख रुपये महावितरणकडून माफ करण्यात आल्याचे यापूर्वीच घोषित करण्यात आले होते. गेल्या वर्षातील या घोषणेनंतर वीज कंपनीने ४८६ कोटी ५१ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीपैकी ५० टक्क्यांच्या आत रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्के रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार वसुली सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनामुळे ही वसुली सध्या थांबवण्यात आली असून येत्या काळात ही वसुली सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नंदुरबार तालुक्यातील ४४ हजार ग्राहकांकडे २२ कोटी रुपयांची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST