शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
4
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
5
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
6
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
7
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
8
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
9
भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकर म्हणाले, "आपल्या लोकांचं रक्त वाहिलं आहे..."
10
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
11
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
12
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
13
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
14
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
15
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
16
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
17
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
18
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती कृती भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
20
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?

सेनेने भाजप सोबत सरकार स्थापन करावे यासाठी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 22:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भाजप-सेनेने एकत्रीत निवडणुका लढविल्या. त्यामुळे दोघांनीच सरकार स्थापन करावे या मागणीसाठी कार्ली येथील स्वत:ला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भाजप-सेनेने एकत्रीत निवडणुका लढविल्या. त्यामुळे दोघांनीच सरकार स्थापन करावे या मागणीसाठी कार्ली येथील स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेणा:या तुकाराम भिका पाटील यांनी नंदुरबारातील मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. तब्बल साडेपाच तासानंतर तो खाली आला. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीची मदत घेत आहे. तसे होऊ नये व शिवसेनेने भाजप सोबतच सरकार स्थापन करावे अशी प्रमुख मागणी तुकाराम पाटील यांची होती.  या मागणीकडे लक्ष वेधले जावे यासाठी त्यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता नंदुरबारातील धुळे रस्त्यावरील गोपाळनगरातील मोबाईल टॉवरवर शोले मधील विरू स्टाईल आंदोलन केले. टॉवरच्या कंपाऊंडच्या गेटवर त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी देखील लिहून तेथे लावली. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादीवर टिका देखील केली आहे. त्यांनी स्वत:ला शिवसैनिक म्हणून घेत दहा वर्ष शाखा प्रमुख म्हणून काम केल्याचा दावा त्यांनी केला आहे.शिवसेना भाजपसोबत जाणार असे आश्वासन मिळेर्पयत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार तुकाराम पाटील यांनी व्यक्त केला. पोलिसांच्या आणि इतरांच्या आवाहनालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. टॉवरवरूनच स्वत:च्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ तयार करून त्यांनी मिडियाच्या प्रतिनिधींर्पयत पोहचविला. अखेर त्यांच्या भावना शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिका:यांर्पयत पोहचविण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर तुकाराम पाटील साडेचार वाजता टॉवरवरून खाली उतरले. लागलीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय लेखी देखील लिहून घेण्यात आले. शिवसेनेने यासंदर्भात हात झटकले आहेत. तुकाराम पाटील शिवसेनेचा कार्यकर्ताच नसल्याचे सेनेने स्पष्ट केले आहे. तुकाराम पाटील यांना खाली येण्यासाठी एकीकडे पोलिसांची दमछाक सुरू असतांना दुसरीकडे शिवसेनेचे दिपक गवते वगळता कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी किंवा प्रशासनातील अधिकारी देखील या आंदोलनाकडे फिरकले नाहीत. आंदोलन पहाण्यासाठी मात्र मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. भर वस्तीतील हा टॉवर असल्यामुळे परिसरातील रहिवाशांनाही त्रास सहन करावा लागला. दरम्यान, तुकाराम पाटील यांनीच वर्षभरापूर्वी याच टॉवरवर त्यांची मोबाईल टॉवर कंपनीने आर्थिक फसवणूक केल्याच्या कारणातून अशाच पद्धतीचे आंदोलन केले होते. 

तुकाराम पाटील शिवसैनिक नाही, सेनेच्या बदनामीचा डाव- गवते

आंदोलक  तुकाराम पाटील यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आपण शिवसैनिक असल्याचे नमूद केले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घटनास्थळी गेलो असता संबंधित व्यक्ती ही शिवसैनिक नसल्याचे स्पष्ट झाल्याचे शिवसेनेच माजी जिल्हा सहसंपर्क प्रमुख दिपक गवते यांनी स्पष्ट केले. आंदोलक व्यक्ती तुकाराम पाटील व  शिवसेनेच्या काही संबंध नाहीय. शिवसेनेला बदनाम करण्याचे  विरोधकांचे षडयंत्र असल्याचे स्पष्टीकरण गवते यांनी केले.