शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

नंदुरबार जिल्ह्याच्या 535 कोटींच्या वार्षिक आराखडय़ास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी उपयोजना आणि उपयोजना क्षेत्राबाहेरील कामांच्या प्रश्नावर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत बरीच गरमागरम चर्चा झाली. दरम्यान, जिल्हा वार्षीक योजनेचा अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील असा एकुण 535 कोटी रुपयांच्या नियतव्यास मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी उपयोजना आणि उपयोजना क्षेत्राबाहेरील कामांच्या प्रश्नावर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत बरीच गरमागरम चर्चा झाली. दरम्यान, जिल्हा वार्षीक योजनेचा अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील असा एकुण 535 कोटी रुपयांच्या नियतव्यास मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक झाली. जवळपास साडेचार ते पाच तास चाललेल्या बैठकीत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. शिवाय जलयुक्त शिवार, वन, विद्युत, आरोग्य, महिला-बालकल्याण, पाणीपुरवठा आणि शिक्षण विषयावर चर्चा झाली.  यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आमदार सुरुपसिंग नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार अॅड.के.सी.पाडवी, आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवाडे, पोलीस अधीक्षक संजय पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी उपस्थित होते.बैठकीत आदिवासी उपयोजना व उपयोजना क्षेत्राबाहेरील कामे व निधी यावर चर्चा करण्यात आली. प्लॅन अँड नॉन प्लॅनची कामे तातडीने सुरू करावीत अशी मागणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली. जलयुक्तची कामे निवडलेल्या गावांशिवाय इतरही गावात कामे व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्ह्यात नकली बियाणे विक्रेत्यांवर काय कार्यवाही केली यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांनी जिल्हाभरातील 35 विक्रेत्यांवर परवाना रद्दची कार्यवाही करण्यात आली आहे. अद्यापही चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजवर मासेमारीसाठी टेंडर काढण्याबाबत मत्स्यविकास अधिकारी यांनी सांगितले असता, सदस्य जयपाल रावल यांनी त्यास विरोध दर्शविला. या दोन्ही ठिकाणी अनेक समाजातील लोक अनेक वर्षापासून मासेमारी करीत आहेत. तसे झाल्यास गावागावात भानगडी होतील. शिवाय नदीवरील बॅरेज असल्याने या ठिकाणी टेंडर काढू नये असा ठराव करावा अशी मागणी जयपाल रावल यांनी केली.आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी वनविभागातर्फे दरवर्षी झाडे लावली जातात, मात्र आहे त्या जंगलाच्या संवर्धनासाठी प्रय} व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तळोदा ग्रामिण रुग्णालयातील भूलतज्ज्ञ महिला कर्मचारी आदिवासी रुग्णांशी अरेरावीने वागतात. संबधीतांची चौकशी करून कारवाईची मागणी केली. पालकमंत्र्यांनी संबधित अधिका:यांना योग्य कार्यवाहीच्या सुचना देत समज देण्याचे सांगितले. किरसिंग वसावे, संध्या पाटील, देवमन पवार, सागर तांबोळी आदींनीही चर्चेत सहभाग घेतला.यावेळी बोलतांना पालकमंत्री रावल यांनी सांगितले, जिल्ह्यात डीपीडीसी मार्फत नाविण्यपुर्ण योजनांची अंमलबजावणी करावी. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करतांना तालुका, ग्रामपातळीवर लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. यंत्रणांनी निधी उपलब्ध होताच कामांना सुरुवात करावी. अखर्चीत निधी मार्चअखेर खर्च करण्यासाठी प्रय} करण्याचा सुचनाही त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी निती आयोगाने नंदुरबार जिल्हा निती आयोगाने दत्तक घेतला आहे. 48 बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्यासाठी पालक सचिवांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा उपनिबंधक एस.वाय.पुरी यांनी जिल्ह्यातील 14 हजार 598 शेतक:यांना 33 कोटी रुपयांची कजर्माफी देण्यात आल्याचे सांगितले.