शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कक्षांमध्ये सुटीच्या दिवशी स्विकारले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 11:38 IST

अक्कलकुवा निवडणूक कक्ष मात्र बंद : इच्छुकांना माहिती नसल्याने व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 51 ग्रामपंचायतींच्या 185 प्रभागात 504 सदस्यपदांसाठी बुधवार्पयत 208 तर सरपंच पदासाठी 27 नामनिर्देशन दाखल झाले आहेत़ सलग चार दिवस पितृपक्षामुळे निर्माण झालेली कोंडी फुटल्यानंतर बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला होता़ गुरूवारी सुटी असल्याचे जाहिर झाल्याने गर्दी झाली होती़ याचदरम्यान गुरूवारी सुटी जाहिर असतानाही उमेदवारांची नामनिर्देशन दाखल करण्यात आल़े यातही केवळ नंदुरबार तालुक्यातील ग्रा़पंसाठी 23 अर्ज दाखल झाल़े  निवडणूक आयोगाने नामनिर्देशन दाखल करण्यासाठी गुरूवारी अचानक सुटी रद्द करण्याच्या सूचना काढल्या होत्या़ गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोगाकडून ही माहिती देण्यात आली़ मात्र ही माहिती उमेदवारांर्पयत न पोहोचल्याने कामाचा दिवस असूनही इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करू शकलेले नाहीत़ आयोगाने अचानक काढलेल्या या आदेशांची माहिती उशिराने मिळाल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली़ सुटीची माहिती असल्याने अद्याप निम्म्यापेक्षा अधिक अर्ज दाखल होणे, क्रमप्राप्त असल्याने शुक्रवारी प्रशासनाचा कस लागणार आह़े विशेष म्हणजे अनेक इच्छुक ऑनलाईन नामनिर्देशन दाखल करण्यासाठी शहरी भागात हजर होत़े त्यांना निवडणूक कक्ष बंद झाल्यानंतर सुटीची सुचना मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली गेली़ अक्कलकुवा येथील तहसील कार्यालयातील निवडणूक कक्ष गुरूवारी दिवसभर बंद होता़ आयोगाने आदेश काढूनही तेथील निवडणूक निर्णय अधिकारी कामावर परत न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े दुपारी तीन वाजेर्पयत याठिकाणी काहींनी भेटी दिल्या होत्या़ सुटी रद्द झाल्याचे आदेश देऊनही अधिकारीच न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आह़े या कक्षाला दिवसभर कुलूप होत़े दुसरीकडे अक्कलकुवा शहरातील ऑनलाइन नामनिर्देशन भरणा  होणा:या तीनही केंद्रांवर गर्दी होती़ तालुक्याच्या विविध भागातून आलेले इच्छुक उमेदवार व त्यांचे पाठीराखे हे याठिकाणी थांबून होत़े सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आयोगाचे पंचायत इलेक्शन हे संकेतस्थळ बंद पडत होत़े गेल्या दोन दिवसात अक्कलकुवा शहरातील सर्व तीन अधिकृत केंद्र व सायबर कॅफेवर नामनिर्देशन दाखल करणारे रात्री उशिरार्पयत थांबून होत़े आता केवळ एक दिवस शिल्लक असल्याने या केंद्रावर पुन्हा गर्दी वाढणार असल्याचे संकेत आहेत़