गुरव समाजाची प्रकाशा येथे वार्षिक सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:53 PM2020-11-23T12:53:08+5:302020-11-23T12:53:19+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :  वसमस्त दाहिगाव गुरव समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रकाशा येथील अन्नपूर्णा मंदिराच्या प्रांगणात  घेण्यात आली. ...

Annual meeting of Guru Samaj at Prakasha | गुरव समाजाची प्रकाशा येथे वार्षिक सभा

गुरव समाजाची प्रकाशा येथे वार्षिक सभा

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा :  वसमस्त दाहिगाव गुरव समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रकाशा येथील अन्नपूर्णा मंदिराच्या प्रांगणात  घेण्यात आली. सभेत समाजासाठी कार्य करणाऱ्या समाज बांधवांना ‘समाज भूषण’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
प्रारंभी  समाजचे आराध्य दैवत महादेव व गुरव समाजचे श्री संत काशीबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. समाजाच्या वतीने शहीद झालेले सैनिक व समाजाच्या स्वर्गावास झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी दाहीगाव गुरव समाजाचे अध्यक्ष नरेंद्र गुरव तर प्रमुख अतिथी म्हणून  जि.प. सदस्य अभिजित पाटील, नंदुरबारचे प्रवीण गुरव, प्रकाशाचे सरपंच सुदाम ठाकरे, अन्नपूर्णा मंदिराचे ट्रस्टी दिलीप पाटील, वि.का. सोसायटीचे चेअरमन हरी पाटील, समाजाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम गुरव, सचिव शशिकांत गुरव, कोषाध्यक्ष वैभव गुरव, शिक्षण समिती अध्यक्ष राधेश्याम गुरव, उपाध्यक्ष संतोष गुरव, प्रसिद्धी प्रमुख गणेश गुरव, संपर्क प्रमुख भूपेंद्र गुरव, सल्लागार नगीन गुरव, सुधाकर गुरव, रवींद्र गुरव, गोकूळ गुरव, राजेंद्र गुरव आदी उपस्थित होते.
सभेत समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रवीण चंद्रकांत गुरव (नंदुरबार), नरेश ओंकार गुरव, भूपेंद्र सुभाष गुरव, आदर्श शिक्षक रवींद्र गुरव, निवृत्त सैनिक शंकर गुरव यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर दाहीगाव गुरव समाजाचे माजी सदस्य राजेंद्र गुरव (शहादा,) गोरख गुरव (प्रकाशा), माजी सचिव हर्षल गुरव, रमेश गुरव, ॲड.प्रभू गुरव, प्रा.रवींद्र गुरव यांचा सत्कार करण्यात आला. नरेंद्र गुरव म्हणाले की, समाजातील अनिष्ट रूढी बंद करा. नारळ-वाटी, वरघोडा प्रथा बंद झाली आहे तर त्याचे नियम पाळा. वेळेवर लग्न लावणे, सामुदायिक विवाह सोहळ्यात तरुणांनी सहभाग घेणे. कोरोनाची परिस्थिती पाहता सर्वांनी नियमांचे पालन करत कार्यक्रम घ्यावेत. लग्नात जास्त गर्दी करू नये, असे सांगितले.  हरी पाटील, अभिजित पाटील, संजय गुरव यांनीही मनोगत व्यक्त केले. समाजाचा वार्षिक लेखाजोखा सचिव शशिकांत आनंदा गुरव यांनी मांडला तर खजिनदार यांनी आर्थिक हिशेबाद्दल माहिती दिली. या सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार होता. मात्र कोरोनाचा पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना बोलवण्यात आले नाही. आलेल्या  पंच प्रमुखांकडे बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रास्तविक शशिकांत गुरव यांनी केले. सूत्रसंचालन राघेश्याम गुरव तर     आभार प्रकाशा गुरव समाज अध्यक्ष रवींद्र गुरव यांनी मानले. सभेसाठी प्रकाशा येथील गुरव समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

Web Title: Annual meeting of Guru Samaj at Prakasha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.