प्रकाशा ते तोरणमाळ रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याचे पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. प्रकाशा ते काथर्दे पुनर्वसनपर्यंत डांबरीकरण झालेले आहे. पुनर्वसनपासून ते काथर्दे दिगरपर्यंत रस्त्याच्या कामाला काही शेतकऱ्यांनी न्यायालयामार्फत स्थगिती आणलेली असल्यामुळे काम बंद आहे. याचठिकाणी संबंधित शेतकऱ्यांनी रस्त्याच्या खालून पाईप लाईन टाकली आहे. ही पाईप लाईन लिकेज झाल्याने रस्त्यात पाणीच पाणी झाल्यामुळे पूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने उसाची भरलेली वाहने फसल्याने रस्त्यात मोठा खड्डा पडला आहे. याठिकाणी चारचाकी वाहन निघत नसल्याने प्रकाशाकडून येणारे वाहन काथर्देजवळून परत १५ ते २० किलोमीटर परत फिरवावे लागत असल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराने वाहनधारकांची समस्या लक्षात घेऊन त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
काथर्देजवळ रस्त्यावर चिखल झाल्याने वाहनधारकांमध्ये संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST