शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

अर्थव्यवस्थेत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर मात्र तरी दरडोई उत्पादन कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 15:15 IST

सागर दुबे । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कवयित्री भारत हा अर्थव्यवस्थेत तिसºया क्रमांकावर असला तरी भारताचे दरडोई घरगुती ...

सागर दुबे ।लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कवयित्री भारत हा अर्थव्यवस्थेत तिसºया क्रमांकावर असला तरी भारताचे दरडोई घरगुती उत्पादन कमी आहे. त्यामुळे तरूणांनी कलेच्या रंगात निर्मिती आणि ज्ञानाचे रंग भरण्याचा प्रयत्न करुन त्या आधारे तरुण पिढीने भारताच्या दरडोई घरगुती उत्पादनात वाढ करण्याची प्रतिज्ञा करावी असे आवाहन अणूशास्त्रज्ञ डॉ़ अनिल काकोडकर यांनी केले़कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक महोत्सवाचे उद्घाटन डॉ. काकोडकर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी. माहूलीकर होते.यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या मानद सचिव कमलाताई पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर संस्थेचे संचालक रमाकांत पाटील, हैदर नुराणी, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सत्यजित साळवे, युवारंग कार्याध्यक्ष दीपक पाटील, व्य.प.सदस्य प्रा.नितिन बारी, प्रा. मोहन पावरा, विवेक लोहार, अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी, प्राचार्य लता मोरे, प्रा.पी.पी.छाजेड, प्राचार्य आर.एस.पाटील, सिलेजचे समन्वयक डॉ.एस.टी.बेंद्रे, अधिसभा सदस्य नितीन ठाकूर, अमोल मराठे, दिनेश खरात, दिनेश नाईक,अमोल सोनवणे, पोलीस उपअधिक्षक पुंडलीक सपकाळे, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. अनिल काकोडकर म्हणाले की, कले सोबत जीवनात पुढे जायचे असले तर तरुणाई शिवाय अशक्य आहे. या युवारंग मधून सादर होणाºया कलारंगासोबत निर्मिती आणि ज्ञानरंगाची जोड द्या. जगात भारत हा अर्थव्यवस्थेत तिस?्या क्रमांकावर असला तरी भारताचे दरडोई घरगुती उत्पादन कमी आहे. तो वाढविण्याची प्रतिज्ञा तरुणांनी करावी असे आवाहनही त्यांनी केले़अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर यांनी विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन पुन्हा केंद्रीय युवक महोत्सव विद्यापीठाने सुरु केला असल्याचे नमूद केले.दिलीप पाटील यांनी महोत्सव म्हणजे कलाविष्काराची संधी आणि सुजान नागरिक तयार करण्याची प्रक्रिया असल्याचे सांगितले.प्राचार्य आर.एस.पाटील यांनी आपल्या भाषणात संस्थेची वाटचाल सांगितली. कार्याध्यक्ष दिपक पाटील यांनी भाव-भावना व्यक्त करण्यासाठी हा महोत्सव असल्याचे सांगितले.विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सत्यजित साळवे यांनी प्रास्ताविक करतांना १२१ महाविद्यालयांच्या २ हजार २०० विद्यार्थी, व्यवस्थापक यांची नोंदणी झाली असल्याचे सांगितले.प्रारंभी गौरव पाटील व प्रिती काकुडदे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली. यावेळी विद्यार्थ्यांसह व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनीही प्रतिज्ञा घेतली़ युवारंग, विद्यापीठ आणि महाविद्यालयाचे ध्वजाचे आरोहण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी पी.के.पाटील, बहिणाबाई चौधरी व नटराजाच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले व दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.विजयप्रकाश शर्मा यांनी केले. समन्वयक व उपप्राचार्य डॉ.एम.के.पटेल यांनी आभार मानले.भारताचा लोहखनिज उत्तम दर्जाचा आहे़ मात्र, त्याची निर्यातीपेक्षा आयात जास्त करतांना भारतात लोहखनिज उत्तम दजार्चे असतांनाही त्याची नियार्ती पेक्षा आयात अधिक आहे. याचा अर्थ तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत आपण कमी पडत आहोत. जगाच्या तोडीचे व स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याचे तंत्रज्ञान निर्माण करण्याचे मोठे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे. यातून शहर आणि खेडी यातील दरी कमी होईल. युध्दयुगाकडून ज्ञानयुगाकडे आपण जात आहोत यामध्ये ग्रामीण भागात अधिक संधी आहे. ज्ञानयुगाची पावले ओळखून तयारी करतांना स्थानिक गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान निर्मिती केली तर ग्रामीण भागात शेतीत क्रांती होईल या शिवाय जोडधंदे अधिक चालतील असा अशावाद त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठाच्या सिलेज प्रकल्पाचा उल्लेख करतांना नवीन तंत्रज्ञानाची ग्रामीण भागात ओळख करुन देणे हा सिलेजचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.मिमिक्री या कला प्रकाराला प्रांरभ होईल, त्या उत्सुकतेने विद्यार्थ्यांची सकाळी ८़३० वाजेपासून आनंदयात्री पु़़ल देशपांडे रंंगमंचासमोर मोेठ्या प्रमाणात गर्दी जमली होती़ त्यानंतर मिमिक्री हा कलाप्रकार झाल्यानंतर उद्घाटन कार्यक्रम या रंगमंचावर झाला़ कार्यक्रमाला प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती़ यामुळे परिसरात खच्चून भरला होता़