कोठार : नंदुरबार जिल्ह्यातील जीम चालक व ट्रेनर सदस्यांच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांना अनलॅाकच्या पहिल्या टप्प्यात इतर व्यवसायाप्रमाणेच जीम सुरू करण्यास परवानगी मिळावी, या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
कोरोनामुळे जीम चालक - मालक यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अनलॉकच्या प्रक्रियेत इतर व्यवसायांप्रमाणेच जीमदेखील सुरू करण्याची गरज असून, त्याला परवानगी मिळावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी समीर सोलंकी, स्वप्नील कदम, आदित्य मालपुरे, विवेक महाले, मयुर तमायचेकर, रितेश चौहान, लोकेश अभंगे, सुहास राणे, कपिल गुमडेलवार, क्रीडा संकुल नंदुरबारचे किशोर पाटील, दिनेश भोपे, प्रशांत मोरे आदींसह नंदुरबार व तळोदा शहरातील जीम चालक उपस्थित होते.
नंदुरबार जिल्हा फिटनेस असोसिएशन स्थापन
नंदुरबार जिल्ह्यात जीम व फिटनेस व्यवसायासंबंधित संघटनेच्या अभावी आजपर्यंत जीम व फिटनेस व्यवसायाला दुर्लक्षित केले जात होते. या गोष्टीला लक्षात घेऊन २ जून २०२१ रोजी नंदुरबार जिल्हा फिटनेस असोसिएशनची स्थापना करण्यात आली. यात अध्यक्षपदी नंदुरबार येथील डी. जी. फिटनेस क्लबचे मॅनेजर स्वप्नील कदम, सचिवपदी तळोदा येथील आदित्य जीमचे संचालक आदित्य मालपुरे तसेच खजिनदारपदी हनुमंत फिटनेस तळोदा सुहास राणे व मयुर तमायचेकर डायमंड फिटनेस नंदुरबार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.