राधेश्याम कुलथे । लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : मुलगी झाली म्हटलं तर आजही काही लोक नाक मुरडतात. वंशाच्या वाढीसाठी मुलगा हवा या हट्टाच्यापोटी मुलगीची कळी पोटातच कुस्करली जाते. पण अशा बुरसटलेल्या आणि प्रस्थापित रूढींना छेद देत शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथे कन्या जन्माचा अनोखा सोहळा पार पडला.याबाबत वृत्त असे की, सुलतानपूर येथील पवार कुटुंबीयात कन्यार} जन्मल्याने कुटुंबीयांनी थाटामाटात स्वागत केले आहे. मुलगा-मुलगी असा भेद न करत मुलीच्या जन्माचे स्वागत करत या कुटुंबाने समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. सुलतानपूर येथील हर्षल यशवंत पवार यांना 8 नोव्हेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. कन्येचे आगमन झाल्याने तिच्या आजी-आजोबानी आनंदात बँडची वाजंत्री लावत घरोघरी जाऊन ग्रामस्थांना जिलेबी वाटप करुन समाजात अनोखा संदेश दिला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्री जन्माचे स्वागत करा, असा संदेश या वेळी देण्यात आला.मुलगीचा जन्म आजही समाजाला नकोसा वाटतो. स्त्रियांनी यशाचे शिखरे पार केली मात्र तिच्या जन्माचे दु:ख करणारे आजही अनेक आहेत. परंतु समाजात हळूहळू का होईना सुधारणा होत आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथे पहावयास मिळाला. आज मुलीही मुलांबरोबरच अनेक क्षेत्रात पुढे जात आहेत. त्यामुळे मुलगा-मुलगी असा भेदभाव करुन तिच्या जगण्याचा हक्क हिरावून घेण्यापेक्षा तिच्याही पंखांना बळ द्या. मुलगी ही शेवटी परक्यांच्या घरी जाणार असे म्हणून तिच्या लग्नाच्या तयारीपेक्षा तिच्या शिक्षणावर खर्च करा. मग पहा मुलगी देखील कुटुंबीयांचा आधार आणि लखलखता दिवा नक्की बनेल, अशी प्रतिक्रिया पवार कुटुंबीयांनी व्यक्त केली.
बँड लावून गावभर जिलेबीचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:54 IST