शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठीच्या सर्वच वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविणार- जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:28 IST

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेच्या पालनाबाबत लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथक, सहाय्यक खर्च नियंत्रण निरक्षक आणि ...

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेच्या पालनाबाबत लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथक, सहाय्यक खर्च नियंत्रण निरक्षक आणि राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असून, त्याद्वारे नियंत्रण कक्षातून वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.पथकांचे काम अधिक कार्यक्षमपणे व्हावे आणि त्यांच्या कामकाजात पारदर्शकता रहावी यासाठी एकूण ३४ वाहनांवर जीपीएस यंत्रणा बीएसएनएलच्या सहकार्याने बसविण्यात आली आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघात प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील चार भरारी पथकांच्या वाहनांवर, उत्पादन शुल्क विभागाच्या चार वाहनांवर आणि सहाय्यक खर्च निरीक्षक पथकाच्या सहा वाहनांवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.भरारी पथकाद्वारे निवडणुकीत पैसे आणि वस्तुंची देवाण-घेवाणीसोबत आचारसंहितेच्या पालनाबाबत लक्ष दिले जाणार आहे. अवैध दारूचा निवडणुकीत होणारा उपयोग रोखण्यासाठी उत्पादनशुल्क विभागाची पथके २४ तास कार्यरत राहणार आहेत. सहाय्यक खर्च निरीक्षकांच्या पथकाद्वारे विविध रॅली-सभा व इतर माध्यमातून निवडणुकीत होणाऱ्या खर्चाबाबत माहिती संकलीत करण्यात येणार आहे.मुक्त आणि नि:ष्पक्ष वातावरणात निवडणुका होण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, जीपीएस यंत्रणेमुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार संघातील विविध भागावर लक्ष ठेवण्याबाबत योग्य नियोजन करणे शक्य होणार आहे.जीपीएस प्रणालीमुळे वाहनाचे निश्चित ठिकाण करणार असल्याने पथकाचे कामकाज पारदर्शक होण्याबरोबरच आवश्यकतेनुसार पथकाला सूचना देणे शक्य होणार आहे. जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे स्वत: जिल्ह्यात विविध ठिकाणी भरारी पथकांना भेट देवून पथकाच्या कामकाजाची पाहणीदेखील करीत आहेत.