शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या चिंचपाड्यातील तिघांचे नमुने धुळ्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळे जिल्ह्यातील साक्री येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चिंचपाडा ता़ नवापुर येथील तिघांना सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धुळे जिल्ह्यातील साक्री येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चिंचपाडा ता़ नवापुर येथील तिघांना सोमवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते़ त्यांचे स्वॅब नमुने धुळे वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीला दिले गेले असून अहवालाकडे लक्ष लागून आहे़धुळे येथील खाजगी रुग्णालयात साक्री येथील कोरोनाबाधितावर उपचार करण्यात येत असताना नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथील ७० वर्षीय वृद्धाला डायलिसिससाठी नेण्यात आले होते़ वृद्धास त्यांची पत्नी व वाहनचालक असे तिघे आठ एप्रिल रोजी धुळे येथे गेले होते़ दरम्यान या तिघांचाही साक्री येथील कोरोनाबाधितासोबत संपर्क आल्याचे धुळे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले होते़ सोमवारी दुपारी धुळे जिल्हा प्रशासनाने नंदुरबार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना माहिती देत चिंचपाडा येथील तिघांना तातडीने क्वारंटाईन करण्याचे सूचित केले होते़ त्यानुसार जिल्हा प्रशासन, नवापुर तालुका प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीसांनी तातडीने चिंचपाडा येथे भेट देत दाम्पत्यासह चालकाला सोबत घेत सोमवारी रात्री उशीरा जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते़ यातील ७० वर्षीय व्यक्तीची प्रकृती ही स्थिर असून त्यांचे मंगळवारी सकाळी डायलिसिस करण्यात आले़तिघांचे स्वॅब नमुने सकाळी धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे़ दाम्पत्य वृद्ध असल्याने त्यांना जिल्हा रुग्ग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात तर चालकाला नवापुर येथील क्वारंटाईन कक्षात दाखल करण्यात आले आहे़सोमवारी रात्री पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, तहसीलदार उल्हास देवरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ हरीश्चंद्र कोकणी यांच्यासह आरोग्य विभागाच्या पथकाने तिघांचा शोध घेतला होता़ तिघांचे स्वॅब नमुन्यांचा अहवाल बुधवारी दुपार पर्यंत मिळण्याची शक्यता आहे़ दरम्यान चिंचपाडा येथील तिघांच्या कुटूंबियांची चौकशी सुरु करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे़