शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

जिल्हाभरात पतंगोत्सवाची दिवसभर धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हवेचा वेग कमी असल्यामुळे सकाळी असलेला निरुत्साह दुपारनंतर मात्र दूर होत, पतंग प्रेमींनी घराच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : हवेचा वेग कमी असल्यामुळे सकाळी असलेला निरुत्साह दुपारनंतर मात्र दूर होत, पतंग प्रेमींनी घराच्या गच्चींवर, उंच टेकडीवर एकच गर्दी करीत पंतग उडविण्याचा आनंद साजरा केला. हजारो रंगबेरंगी पतंगांनी दुपारनंतर आकाश व्यापले होते. ठिकठिकाणी ध्वनीक्षेपक लावून पतंग उडविण्याचा आनंद घेतला जात होता. सायंकाळी सूर्यास्तानंतर दिव्याचे पतंग देखील आकाशात ठिकठिकाणी दिसून येत होते.शहरात दरवर्षापेक्षा यंदा पतंगोत्सवाचा उत्साह काही औरच होता. पतंग उडविण्यासाठी अपेक्षित हवेचा वेग सकाळी नव्हताच. त्यामुळे पहाटे पाच वाजेपासून डीजेच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजावर पतंग उडविण्यास युवकांनी सुरुवात केली. परंतु पतंग आकाशात जातच नव्हती. दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत ही स्थिती कायम होती. नंतर मात्र हवेचा वेग बºयापैकी झाला. त्यामुळे आकाश रंगबेरंगी पतंगांनी व्यापून गेले होते. रात्री उशिरापर्यंत हा उत्साह कायम होता.रात्रीही काही हौसी पतंगप्रेमींनी दिव्याचे मिणमिणते पतंग उडविण्याची हौैसही भागवून घेतलीच. मंगळवारी रात्री तर पतंग विक्री करणारे व मांजा बनविणाऱ्यांकडे मोठी गर्दी झाली होती. मध्यरात्री एक वाजेपर्यंत पतंगांचा बाजार भरला होता. मुख्य चौक व रस्त्यांवर पतंग विक्रीची दुकाने थाटण्यात आली होती.पतंगत्सोवाची रंगत दिवस उजाडण्याआधीपासूनच सुरू झाली होती. डीजे, ढोल-ताशांच्या निनादात पहाटेपासून पतंग उडविले जात होते. घरांच्या गच्चीवर लावण्यात आलेले डीजे व ढोल-ताशे यामुळे नुसतेच ध्वनिप्रदूषण सुरू होते. दिवसभर ढगाळ वातावरण, गारठा यामुळे पतंगप्रेमींमध्ये उत्साह संचारला होता.दुपारी दोन वाजेपासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक घराची गच्ची पतंग उडविणाºयांनी व्यापून टाकली होती. सायंकाळी अंधार पडल्यावर अनेक हौशी मंडळींनी फटाक्यांची आतषबाजी केली. दिवसभर पतंगांनी व्यापलेले आकाश रात्री शोभिवंत फटाक्यांनी उजळून निघालेले होते.दिवसभरातून वेगवेगळ्या भागात किमान २५ ते ३० वेळा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला. तुटलेला मांजा, पतंग विजेच्या तारांमध्ये अडकत असल्यामुळे अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत होते.रस्त्यावर पडलेला मांजा केला गोळा...४रस्त्यावर पडलेला, झाडांमध्ये अडकलेल्या मांजामुळे अनेकजण जायबंदी होत होते. ही बाब लक्षात घेता सिंधी कॉलनी परिसरात अजय पाडवी रा.इंदिरा मंगल कार्यालयामागे या युवकाने दिवसभर रस्त्यावरील मांजा गोळा केला. दुचाकीचालकांना तो मांजापासून सावध देखील करीत होता. यामुळे अनेकजण जायबंदी होण्यापासून वाचले. दिवसभर त्याने हा आपला उपक्रम सुरू ठेवला होता. त्याचे अनेकांनी कौतूक देखील केले. दरम्यान, नायलॉन दोºयावर बंदी असतांनाही ठिकठिकाणी नायलॉनचा मांजाचा वापर पतंग उडविण्यासाठी होत होता.पतंगांच्या मांजामुळे जखमी झालेल्या पक्ष्यांना बर्ड कॅम्पमध्ये जीवदान देण्यात आले. दोन कबुतर व एका घुबडाच्या पिलूला जखमी अवस्थेत काहींनी आणले होते. त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. नंदुरबारातील जैन मंदीराजवळ जैन यंग अलर्ट ग्रृप, ज्ञानहंस ग्रृप व महाविर सेना ग्रृप यांच्यातर्फे हा कॅम्प लावण्यात आला होता. तिन्ही संस्थांचे पदाधिकारी व डॉक्टर येथे उपस्थित होते.शहरातील मोठी व डौलदार झाडे पतंगांनी व्यापलेली दिसून येत होती. कापलेली पतंग तसेच फाटलेली पतंग मोठ्या झाडांवर अडकून पडत होती. प्लॅस्टिकच्या बारीक कागदाच्या पतंग असल्यामुळे त्या उन्हात व रात्रीच्या अंधारात चमकत होत्या. पक्ष्यांचा आसरा असलेल्या अशा झाडांवर पतंगांमुळे पक्षी चलबिचल झालेले दिसून येत होते.