शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

मद्यधुंदांनी चढवला कोविड हॉस्पिटलवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 21:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील वळणरस्त्यावर असलेल्या निम्स कोविड हॉस्पिटलवर अज्ञात मद्यधुंद तरुणांनी हल्ला करत कर्मचारी व कोरोनाबाधितास ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील वळणरस्त्यावर असलेल्या निम्स कोविड हॉस्पिटलवर अज्ञात मद्यधुंद तरुणांनी हल्ला करत कर्मचारी व कोरोनाबाधितास मारहाण केली़ शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला़शनिवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली असून आयएमएच्या जिल्हा शाखेकडून या कृत्याचा निषेध करण्यात आला आहे़ शनिवारी रात्रीच्यावेळी वळणरस्त्यावर निम्स कोविड हॉस्पिटल समोर काही मद्यधुंद तरुणांनी एका ट्रकचालकास अडवून त्याच्यासोबत वाद घातला होता़ रस्त्याच्या मधोमध हा वाद सुरू असताना हॉस्पिटलचे कर्मचारी बाहेर येऊन हा प्रकार पाहत होते़ दरम्यान एक कर्मचारी घरी जात असताना मद्यधुंद तरुणांनी त्यास थांबवून शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली़ त्याला वाचवण्यासाठी इतर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी बाहेर धाव घेतली़ त्यांनाही तिघांकडून मारहाण करण्यास सुरूवात झाली़ या प्रकाराने भांबवलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकाने रुग्णालयात धाव घेतली़ तो दुसºया मजल्यावर पळत गेला़ त्याचा मारहाण करणाºया एका संशयितांने पाठलाग केला़ त्याने हाता बांबू हातात घेत दुसºया मजल्यापर्यंत जावून तोडफोड करत कोविड रुग्ण आणि कर्मचारी अशा दोघांना मारहाण करत करत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला़ रुग्णालयात दाखल असलेल्या एका पोलीस अधिकाºयाला या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच शहर पोलीस ठाण्यात माहिती देत पोलीसांना तातडीने दाखल होण्याचे सूचित केले होते़ शहर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यावर राकेश उर्फ सुरेश देविदास सामुद्रे, रविंद्र देविदास सामुद्रे व दिपक नारायण मराठे या तिघांना ताब्यात घेण्यात येऊन पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले़ तिघांविरोधात उमेश गुलाबराव पाटील यांच्या फिर्यादीवरून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे़