लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : यावर्षी गणेशभक्तांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने नियमांचे पालन करून साजरा करावा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी अक्कलकुवा येथे गणेशोत्सव व विविध सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केले़ अक्कलकुवा तहसील कार्यालयात ही बैठक घेण्यात आली़बैठकीस सरपंच राजेश्वरी वळवी, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सचिन म्हस्के, निवासी नायब तहसीलदार विजयसिंग कच्छवे, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी, जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, कपिलदेव चौधरी, माजी उपसरपंच विश्वास मराठे ,छोटू हाश्मी, अनिल जावरे, माजी उपसरपंच ललित जाट, शुभम भंसाली उपस्थित होते़यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक गवळी यांनी मार्गदर्शन केले़उपविभागीय पोलिस अधिकारी कदम यांनी गणेशोत्सवातील नियमावलीचे वाचन करून दाखवले. विविध मान्यवरांनी गणेशोत्सव तसेच विविध सण-उत्सव साजरा होत असतानाच कोरोना महामारीचा संसर्ग लक्षात घेऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले़कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागासह सपाटीच्या गावात पाच महिन्यांपासून परिश्रम घेणाऱ्या महसूल, पोलीस प्रशासन, पंचायत समिती आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बैठकीस उपस्थित असलेले राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मंडळांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कौतूक केले़ बैठकीस तालुक्यातील विविध भागातील शांतता समितीचे सदस्य तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
अक्कलकुवा शांतता कमिटीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:49 IST