लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मोकस ता़ अक्कलकुवा येथे अपघात प्रकरणी दोषी चालकाला न्यायालयाने शिक्षा सुनावली आह़े जानेवारी 2016 मध्ये झालेल्या अपघात एक जण ठार तर इतर प्रवासी जखमी झाले होत़े बिजरीगव्हाण ता़ अक्कलकुवा येथील दिनेश रायसिंग वसावे हा जानेवारी 2016 मध्ये एमएच 14 पी 2413 या प्रवासी वाहनात डिङोल भरण्यासाठी गुजरात राज्यात जात होता़ दरम्यान त्याच्या गाडीत पिंपळखुटा येथील किसन कागडय़ा राऊत व त्यांचा मुलगा बसले होत़े दोघेही वडफळी येत दवाखान्यात जात होत़े दरम्यान हे वाहन मोकस गावाजवळ आले असताना चालक वसावे याचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्डय़ात जाऊन पडल़े यात किसन राऊत यांचा मृत्यू झाला होता़ याबाबत मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान अपघातप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जीवन परदेशी यांनी अक्कलकुवा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होत़े न्यायमूर्ती आनंद ़डी़करभजन यांच्यासमोर साक्षी पुरावे तपासल्यानंतर दिनेश वसावे हा दोषी आढळल्याने त्यास विविध कलमांतर्गत चार महिने कारावास व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली़ खटल्याचे कामकाज सरकारी वकील अॅड़ अजय सुरळकर यांनी पाहिल़े पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीदान राऊळ यांनी काम पाहिल़े पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत व अप्पर पोलीस अधिक्षक यांनी तिघांचे कौतूक केले आह़े
अक्कलकुवा न्यायालयाने वाहनचालकास ठोठावली शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:06 IST