लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा येथील सर्व तिन्ही रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. असे असले तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना कायम राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी देखील प्रशासनाच्या सुचनांचे वेळोवेळी पालन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.अक्कलकुवा येथील पहिली कोरोनाबाधीत महिला व या महिलेच्या संपर्कातील इतर दोन महिला यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. या सर्वांचे नंतरच दोन अहवाल निगेटिव्ह आल्याने व त्यांची प्रकृतीही ठणठणीत झाल्याने जिल्हा रुग्णालयाने या तिन्ही महिला रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे अक्कलकुवा हे पहिले कोरोनामुक्त शहर झाले आहे.दरम्यान, तालुक्यातील ब्रिटीश अंकुशविहिर आरोग्य केंद्रातील वाहन चालक देखील कोरोनाग्रस्त आहेत. त्यांच्यावरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचे सलग दोन अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.शहादाही आशावादीशहाद्याही कोरोनामुक्तीसाठी आशवादी आहे. येथे जिल्ह्यातील सर्वाधिक अर्थात नऊ रुग्ण आढळून आले होते. या पैकी अवघ्या तिसऱ्याच दिवशी शहरातील पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शहरवासीयांना मोठा धक्का बसला होता. परंतु शहरवासीयांनी संयम बाळगत कोरोनावर मात करण्याचे ठरविले आणि त्यात ते यशस्वीही होतांना दिसत आहे.पहिल्या रुग्णाच्या परिवारातील एक सदस्य चार दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाला होता. त्यानंतर शहरातील दुसरा युवक कोरोनामुक्त झाल्याचे शनिवारी जाहीर करण्यात आले. आता सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार घेणारे रुग्ण देखील चांगला प्रतिसाद देत असल्याने आता त्यांच्या दुसºया व तिसºया अहवालाची प्रतिक्षा लागून आहे. सर्वांचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यावर लागलीच त्यांनाही कोरोनामुक्त घोषीत करून रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे.नंदुरबारकरांनीही तयारी करावीकोरोनामुक्ती साठी नंदुरबारकरांनीही तयारी करणे आवश्यक आहे. नंदुरबार शहरातील पहिले चारही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने एक पोलीस कर्मचारी आणि एक महिला कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यातील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे तर पोलीस कर्मचाºयाचाही लवकरच कोरोनामुक्त होण्याची अपेक्षा आहे. आता नंदुरबारकरांनी काळजी घेत सतर्क राहणे आवश्यक आहे. तरच हे शक्य आहे.ग्रामिण भागातील आष्टे आणि नटावद येथील रुग्णांच्या प्रकृतीकडे देखील लक्ष लागून आहे.
४नंदुरबार आणि आष्टे येथे आढळून आलेल्या दोन कोरोना संसर्गीत रुग्णांच्या संपर्कातील तब्बल १६० जणांच्या अहवालांची प्रतिक्षा लागून आहे. शनिवार व रविवारी सकाळी हे नमुने पाठविण्यात आले आहेत.४नंदुरबार आणि आष्टे येथील कोरोनाबाधीत दोन्ही वृद्धा या नंदुरबारातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यामुळे त्यांची कॉन्टॅक्ट लिस्ट मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेकांची स्वत:हून स्वॅब तपासणीसाठी दिले असल्याचे चित्र आहे.