शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

परतीच्या पावसामुळे शेती उत्पादन पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : परतीच्या अवकाळी पावसाने गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा रिपरिप हजेरी लावल्याने खरीप पिकांचे नुकसान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : परतीच्या अवकाळी पावसाने गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा रिपरिप हजेरी लावल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले आह़े शहादा, तळोदा, नंदुरबार आणि नवापुर या तालुक्यात खरीप उत्पादन ओले झाल्याने शेतक:यांच्या चिंता वाढल्या आहेत़  दरम्यान नवापुर तालुक्याच्या काही भागात तीव्र वारे वाहून घरे आणि शाळा इमारतींचे नुकसान झाले आह़े     

नवापुर   परतीच्या पावसाने नवापूर तालुक्यातील कापणीचा भात, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कपाशी, मका, फळबाग, भाजीपाला, फुल शेती व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नवापूर तालुक्यातील धायटा भाग, पश्चिम पट्टा, रायपूर, चौकी, पाटीबेडकी, खोकसा, चिंचपाडा, विसरवाडी, खांडबारा, धानोरा, कोठली, नटावद, आष्टे, ठाणेपाडा, टोकरतलाव, वांझळे, खोलघर व नंदुरबार परिसरातील इतर भागात शेतक-यांचे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी काढणीसाठी तयार असलेल्या शेतमालाचे नुकसान झाल्याने तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावुन नेला आहे. बहुतांश भागात खरिपाची पिके सडुन गेली आहेत. किडीचाही प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी बांधव अनेक अडचणींचा एकाचवेळी सामना करीत आहेत. भातशेती, फळबागा व फुलबागा पाण्याखाली गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. 

शहादा   तालुक्यातील 10 मंडळांपैकी 2 मंडळात सोमवारी मध्यरात्र ते मंगळवार पहाटेदरम्यान पावसाने हजेरी लावली़ काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने कापसाची बोंडे झाडावरुन गळून पडली होती़ मोहिदे व शहादा मंडळात झालेल्या पावसामुळे काढणी केलेली ज्वारी, मका, सोयाबीन यांचे नुकसान झाल्याची माहिती आह़े तहसीलदार मिलींद कुलकर्णी यांनी तलाठी व मंडळाधिकारींना पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार मंगळवारी दिवसभरात तलाठींनी कामकाज केल्याची माहिती देण्यात आली आह़े  तालुक्यातील आवगे जुनवणे परिसरात पावसामुळे ज्वारीचे तसेच इतर शेती पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याचे शेतक:यांनी सांगितल़े    तळोदा   तालुक्यातील विविध भागात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होत़े रात्री उशिरा पावसाने हजेरी लावल्याने खरीप उत्पादनाचे नुकसान झाले आह़े पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने बहुतांश ठिकाणी शेतक:यांनी पिक सुरक्षित करुन ठेवले होत़े शेतातील उभ्या कापसाला पावसाचा काही अंशी फटका बसला असल्याची माहिती देण्यात आली आह़े तळोदा शहरात रात्री उशिरार्पयत रिपरिप पाऊस सुरु होता़ नंदुरबार   तालुक्यातील दक्षिण-पश्चिम भागात सोमवारी सायंकाळपासून विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली़ काही ठिकाणी मध्यम तरी काही ठिकाणी रिपरिप सरी कोसळत होत्या़ रात्री उशिरार्पयत नंदुरबार शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली़ यादरम्यान तालुक्यातील घोगळगाव येथे रात्री 12 वाजेच्या सुमारास संजय शांताराम सूर्यवंशी यांच्या एका बैलावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला़ सकाळी घटनेचा पंचनामा करण्यात येऊन अहवाल देण्यात आला आह़े तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंडळाधिकारी व तलाठी यांच्यामार्फत प्रशासन घेत असल्याची माहिती नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांनी दिली आह़े 

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार शिरीषकुमार नाईक यांनी तालुक्यात भेटी देत पाहणी केली़ यावेळी त्यांनी परतीच्या अवकाळी पावसाने तालुक्यातील शेती व फुल पिकांचे मोठे नुकसान झाले असुन राज्यशासनाने नुकसानीची भरपाई द्यावी व त्यासाठी प्रशासनाने नुकसानाचे पंचनामे करावे अशी मागणी केली़ याबाबत त्यांनी नवापुर तहसीलदार यांना निवेदन दिले आह़े निवेदनात  नवापूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. आदिवासीचे प्रमुख अन्न भात आहे. परतीच्या पावसाने भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीचा भात, मका, सोयबीन, बाजरी,ज्वारी कापनी करून शेतात साठवल्याने जमीनीवर कोंब फुटल्याने व कपाशीची बोंड जमिनीवर पडून गेल्याने शेतक:यांच्या तोंडातला घास हिरावला गेला. काही भागातील शेती पाण्याखाली राहिल्याने शेतजमिनीचे नुकसान झाले आह़े या पाश्र्वभूमीवर संपूर्ण भागातील नुकसानीचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी जागेवर जावून तातडीने पंचनामे करून शेतक:यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे.

वादळामुळे नवापुर तालुक्यातील घोगळपाडा माध्यमिक विद्यालयाचे पत्रे उडून गेल़े  पाऊस कोसळल्याने शाळेतील पोषण आहाराच्या तांदूळाची नासाडी झाली़ शहादा तालुक्यातील पुसनद, कहाटूळ, अनरद, सोनवद, लोंढरे, वडछील या गावांमध्ये रात्री उशिरा पाऊस कोसळला़ यात सोयाबीन पूर्णपणे खराब झाला असून कापसाची बोंडे तुटून पडल्याची माहिती देण्यात येत आह़े शेतकरी दुपारी शेतात गेल्यानंतर नुकसानीची स्थिती समोर आली़ शहादा तालुक्यातील सारंगखेडा परिसरात मंगळवारी पहाटेर्पयत पाऊस सुरु होता़ यातून पपई पिकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल़े अनेक ठिकाणी पपई गळून पडल्याचे प्रकार घडल़े शेतक:यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शेतक:यांनी प्रशासनाला देऊन कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े