शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास उपचार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास उपचार देण्यासाठी विशेष वॉर्डची निर्मिती करण्यात आली आहे़ या वार्डात रुग्ण दाखल करुन तातडीचे उपचार करण्यात येणार आहेत़जिल्ह्यात गेल्या १५ दिवसात झालेले वातावरणीय बदल आणि परराज्य आणि पदेशात येथील नागरिकांचे होणारे दौरे यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची भिती आहे़ लगतच्या गुजरात राज्यातून वेळावेळी नागरिकांचा प्रवास होत असल्याने कोरोना पसरण्याची शक्यता लक्षात घेत जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस दल यांनी दक्षता म्हणून सतर्कता बाळगणे सुरु केले आहे़ जिल्ह्यात अद्याप कोणी परदेशी नागरिक आलेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ परंतू फिरण्यासाठी उत्तर भारतातील राज्यात जाऊन परतलेल्या नागरिकांनी दक्षता म्हणून तपासणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ मुंबईसह राज्यातील गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्कता म्हणून मास्क बाळण्याचे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे़ जिल्हा रुग्णालयासोबतच जिल्हा आरोग्य विभागानेही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोयी करण्यावर भर दिल्याची माहिती देण्यात आली आहे़ थंड हवेच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांकडून दक्षता घेण्याबाबत सातत्याने सूचना करण्यात येत आहे़ तज्ञांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यात कोरोना विषाणू तग धरणे कठीण असले तरी बदलत्या वातावरणाची त्याला साथ मिळण्याची शक्यताही त्यांच्याकडून नाकारण्यात आलेली नसल्याची माहितीही देण्यात आली आहे़नंदुरबार जिल्हा रुग्णालयात सहा बेड असलेला वॉर्ड तयार करण्यात आला आहे़ या वॉर्डमध्ये स्वच्छता ठेवून येणाºया जाणाºया सर्वांसाठी सॅनेटायझेशची सुविधा देण्यात आली आहे़ वॉर्डात व्हेंटीलेटर ठेवण्यात आले आहे़ अद्याप याठिकाणी रुग्ण दाखल झालेले नसले तरी दर दिवशी येथील औषधी व यत्रांची माहिती घेऊन ते अपडेट करण्यावर भर दिला जात आहे़ जिल्ह्यातील ११ ग्रामीण रुग्णालय आणि २ उपजिल्हा रुग्णालयातही येत्या काळात याप्रकारे सोय करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे़ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात यापूर्वी स्वाईन फ्ल्यू झालेले रुग्ण दाखल झाल्यानंतर तातडीने उपचार व्हावेत म्हणून वॉर्डाची निर्मिती करण्यात आली होती़ याचप्रकारे कोरोना संशयितांवर उपचार करण्याबाबत प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे़ रुग्ण आढळल्यास उपचार करणाºया वैद्यकीय पथकालाही वेगळी सुविधा मिळून त्यांना केवळ येथे तैनात केले जाऊ शकते़४कोरोना व्हायरसबाबत अनेक समज आणि गैरसमज सध्या फैलावत आहेत़ या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आजाराबाबत विस्तृत माहिती दिली़४कोरोना जंतू हे कोरोना परिवारातील विषाणू आहे़ हा विषाणू श्वसनाचे संसर्गजन्य रोग निर्माण करतो़ यापूर्वी निर्माण झालेले सार्स आणि मर्स हे आजार त्याच पठडीतील होते़४प्रामुख्याने श्वसनक्रियेमार्फत, अस्वच्छ हातांद्वारे, पंचनसंस्थेमार्फत त्याचा प्रसार होऊ शकतो़४हलका ताप, घसा दुखी, खोकला, अंगदुखी व मरगळ ही सौम्य लक्षणे आहेत़४जोराचा ताप, पिवळा बेडका, छातीत दुखणे, दम लागणे ही मध्यम लक्षणे आहेत़४श्वसनक्रिया अपयशी, शरीरभर संक्रमण, इतर अवयव निकामी होणे ही तीव्र लक्षणे आहेत़४गरोदर माता, लहान मुले, वयोवृद्ध नागरिक, रोगप्रतिकार शक्ती कमी असलेले, स्टेरॉईट युक्त औषधी घेणारे तसेच कॅन्सरग्रस्तांमध्ये कोरोनाचा फैलाव अधिक होऊ शकतो़४या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशिष्ट उपचार व लसीकरण नसले तरी लाक्षणिक उपचार, रुग्णाची निगा आणि संतुलित आहार यातून रुग्ण बरा होऊ शकतो़ रीयल टाईम पीसीआर विषाणूच्या जनुकीय रचनेची चिकित्सा, घशातील व थुंकीतील व शरीरातील द्रव्य तपासणी व लाक्षणिक चाचण्यातून रक्ताची पेशीची चाचणी, छातीचा एक्सरे व सीटी स्कॅन करुन या कोरोना बाधित आहे किंवा नाही, याचे निदान होते़शासनाकडून यापूर्वी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याबाबत नागरिकांना सूचना करण्यात आल्या आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात परदेशातून, मुंबईसारखी मोठी शहरे आणि उत्तर भारतातून आलेल्या नागरिकांनी आरोग्याबाबत दक्षता बाळगली पाहिजे़ गर्दीच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी लहान मुलांना सोबत घेऊन जाणे टाळावे़-महेंद्र पंडीत, जिल्हा पोलीस अधिक्षक,नंदुरबाऱशासनाने दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा रुग्णालयात वॉर्ड तयार केला आहे़ यासाठी यदाकदाचित कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल करण्यात आलाच तर तज्ञांचा समावेश असलेले आरोग्य पथक तयार करण्यात आले आहे़ अद्याप जिल्ह्यातून कुठेही कोरोनाग्रस्त संशयित रुग्णाची नोंद करण्यात आलेली नाही़ परंतू दक्षता म्हणून यंत्रणा सज्ज आहे़-डॉ़ के़डी़सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक,नंदुरबाऱशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांची माहिती आरोग्य विभागाला दिली आहे़ जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही़ सर्व प्रशासन सज्ज आहे़ शासनाकडून आलेल्या परिपत्रकानुसार सर्वच विभागांना सूचित करण्यात आले आहे़ जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणांबाबतही सूचना केल्या आहेत़ नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊ नये तसेच अफवा पसरु नयेत याबाबत वेळोवेळी जागृती केली जात आहे़-धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी, नंदुरबाऱ