नंदुरबार : तापमानात मोठी वाढ होत असताना दुसरीकडे विजेची मागणीही वाढली असल्याचे दिसून येत आहे़ सध्याच्या परिस्थितीला जिल्ह्याला २५० मेगावॅट वीजेची आवश्यकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ तर नंदुरबार शहरातदेखील ८ मॅगावॅटची मागणी आहे़दरम्यान, सध्या जिल्ह्यात नंदुरबार, विसरवाडी, तळोदा, शहादा तसेच समशेरपूर या पाच अतिउच्चदाब असलेल्या उपकेंद्रातून तसेच ५८ विविध ठिकाणच्या ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात येत आहे़ गेल्या वर्षी जुलै महिन्यात वीजेची सर्वाधिक मागणी वाढली होती़ ती साधारणत ३०० मेगावॅटपर्यंत गेलेली होती़ सध्या तापमानात मोेठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने मे-जूनपर्यंत वीजेच्या मागणीत अधिक वाढ होणार असल्याची माहिती मिळाली आहे़लोडशेडींगची समस्या नाहीगेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झालेली आहे़ त्यामुळे साहजिकच उन्हाळ्यात वीजेला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असते़ सध्या महावितरणकडे पर्याप्त वीज उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले असले तरी, मागील वर्षीचा अनुभव बघता यंदाही मेपर्यंत वीजेच्या मागणीत अचानक मोठी वाढ होऊ शकते असे सांगण्यात येत आहे़ मागील वर्षी जुलै महिन्याता वीजेची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती़ गेल्या वर्षी पाऊसदेखील समाधानकारक झाला नसल्याने मागणीनुसार वीजपुरवठा करणे हे महावितरणसमोर आव्हान होते़राज्यात १९ हजार ४३३ मेगावॅट वीजेची आवश्यकताराज्यात सध्या १९ हजार ४३३ मेगावॅट वीजेची आवश्यकता आहे़ सध्या राज्यात कोळश्याचा पुरवठा बऱ्यापैकी होत असल्याने वीजेची टंचाई भासनार नसल्याचे महावितरणच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे़ एप्रिल महिना पूर्ण तसेच मे व जूनपर्यंत ही मागणी २१ हजार मॅगावॅटच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ सर्वसाधारण दिवसांमध्ये राज्यात १५ हजार ६०० मेगावॅटपर्यंत वीजेची आवश्यकता असते़ वाढत्या तापमानामुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे़ त्यामुळे शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे़ पाण्याअभावी पिक वाया जाण्याच्या स्थितीत असल्याने शेतकऱ्यांकडून मोठ्या संख्येने कृषीपंपाचा वापर करण्यात येत आहे़ त्यामुळे साहजिकच कृषिपंपासाठी मोठ्या प्रमाणात वीजेची आवश्यकता असते़ ग्रामीण भागात वीज बचत करण्यासाठी अनेक वेळा भारनियमणाचा मार्गदेखील अंमलात आणला जात असतो़ शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणा कृषीपंपाचा वापर वाढला असल्याने मुख्यत्वे दिवसा वीज वितरणावर मोठ्या प्रमाणात लोड येत असल्याचे सांगण्यात आले आहे़उकाड्यात झाली वाढतापमान व आद्रता वाढली असल्याने साहजिकच मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत असतो़ त्यामुळे नागरिकांकडून फ्रीज,एसी, कुलर पंखे आदींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे़ त्यामुळे साहजिकच दिवसा व रात्रीची मोठ्या प्रमाणात वीजेची मागणी वाढत असते़ जिल्ह्यात उद्योग-धंदे नसले तरी घरगुती वापर, शेती क्षेत्रात होणारा विजेचा वापर बघता वीजेची मोठी मागणी आहे़ नंदुरबार शहराचा विचार करता, नंदुरबारात नेहरु नगर, एकता नगर, पातोंडा येथील उपकेंद्राव्दारे साधारणत: सात ते आठ मेगावॅटचा वीजपुरवठा करण्यात येत असतो़ नंदुरबार शहरात उन्हाळ्यात ७० लाख युनीटची मागणी असते़ तीच मागणी सामान्य दिवसांमध्ये ५० लाख युनिटपर्यंत जात असते़
शहरात ८ मे.वॅ.ची अतिरिक्त मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 11:41 IST