शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आमलाड येथे उपक्रम : तळोदा प्रकल्प कार्यालयाने केले कन्यादान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 17:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील आमलाड येथे 575 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला़ आदिवासी विकास विभाग आणि एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा जंबो विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता़ तळोदा प्रकल्प कार्यालयांतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थीसाठी हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील आमलाड येथे 575 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला़ आदिवासी विकास विभाग आणि एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा जंबो विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता़ तळोदा प्रकल्प कार्यालयांतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थीसाठी हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. हिना गावीत होत्या़ यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजयकुमार गावित, प्रकल्पाधिकारी विनय गौडा, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य नागेश पाडवी, भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष अमृतसिंग पावरा, जयवंत पाडवी, हुसेन पाडवी, आमलाडचे सरपंच सदाशिव ठाकरे उपस्थित होत़े प्रास्ताविकात प्रकल्पाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले की, तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या तीन तालुक्यात 87 टक्के  आदिवासी बांधव राहतात़ आर्थिक परिस्थिती खालावलेल्या आदिवासी बांधवांना लग्नासाठी फार खर्च येतो़ त्यांचा हा खर्च कमी व्हावा, यासाठी या सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आह़े डॉ़ विजयकुमार गावित यांनी सांगितले की, ही योजना राज्यात मंत्री असताना सुरू केली होती़ आदिवासी समाज बांधवांसाठी अनेक योजना ह्या सुरू केल्या त्यामुळे आरोग्य आणि शिक्षणाचे प्रश्न सुटले आहेत़ खासदार डॉ़ हीना गावित यांनी सांगितले की, केंद्रशासनाने गर्भवती मातांसाठी अमृत आहार योजना सुरू केली आह़े या योजनेचा महिलांनी लाभ घेतला पाहिज़े गर्भवती महिलांनी दवाखान्यात नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून रूग्णालयांमध्ये त्यांच्या सर्व चाचण्या पूर्ण होऊन त्यांच्यावर त्या रूग्णालयात उपचार करणे सोपे होईल़ यासोबतच महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या माध्यमातून कुटुंबातील सदस्य आजारी पडला तर दोन लाखापयर्ंतचा खर्च मिळेल़ सामूहिक विवाह सोहळ्यामुळे मोठी आर्थिक बचत होऊन अनिष्ट चालीरितींनाही फाटा देता येणार आह़े सामूहिक विवाहमुळे  वाचलेला व मिळालेला पैसा आपल्या भविष्य यासाठी उपयुक्त ठरणार असल्याने सोहळ्यात अधिकाधिक तरुणांनी सामील व्हाव़े कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.डी. पाटील केले. कार्यक्रमास धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातून आदिवासी बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े प्रकल्प कार्यालय प्रशासनाकडून वसतीगृहाला लागून असलेल्या मैदानात पार्किगची व्यवस्था केली होती़ याठिकाणी कर्मचा:यांसोबतच वसतीगृहाचे विद्यार्थी स्वयंसेवक विविध कामे करत होत़े जेवण आणि इतर सर्व सुविधा देण्यासाठी विद्याथ्र्यानी मार्गदर्शन केल़े विद्याथ्र्यानी स्वच्छतेबाबतही जनजागृती केली़