बाजाराच्या दिवसांमुळे होती प्रचंड गर्दी
तळोदा शहराच्या बाजाराचा दिवस असल्याने बाजार करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी शहरात गर्दी केली होती. विविध भागांतून व्यावसायिक आले होते. त्यामुळे दुकानांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे गरजे असताना नियमावलीचा अक्षरशः फज्जा उडाला होता. शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर पालिकेने कारवाई केली असली तरी प्रशासनानेदेखील नियमांचे पालन करण्यासाठी सजग राहणे आवश्यक आहे. मात्र गरजेच्या ठिकाणी पालन करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. शहराबाहेरून येणारे नागरिक सामाजिक अंतर व मास्कचा वापर नसल्याचे चित्र असून, संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेण्याची गरज आहे.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत नागरिक व व्यावसायिकांमध्ये जनजागृती केली आहे. तरीही काही व्यावसायिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पालिकेला सहकार्य करावे.
-सपना वसावा, मुख्याधिकारी, नगरपालिका, तळोदा