शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

कुष्ठरोगींच्या सेवेसाठी नंदुरबारात ‘अॅक्शन प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 12:53 IST

नंदुरबार : जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी प्रशासनाने यंदाही पावले उचलली असून जुलै ते ऑक्टोबर यादरम्यान कुष्ठरोगमुक्तीचा अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आह़े गेल्या तीन वर्षात कुष्ठरोग निमरूलन आणि जनजागृती यासाठी राबवलेल्या कार्यक्रमांमुळे जिल्ह्यात आजअखेर केवळ 336 कुष्ठरोगी असून यातही 1 रुग्ण हा विकृत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आह़े राष्ट्रीय कुष्ठरोग निमरूलन कार्यक्रमांतर्गत ...

नंदुरबार : जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी प्रशासनाने यंदाही पावले उचलली असून जुलै ते ऑक्टोबर यादरम्यान कुष्ठरोगमुक्तीचा अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आह़े गेल्या तीन वर्षात कुष्ठरोग निमरूलन आणि जनजागृती यासाठी राबवलेल्या कार्यक्रमांमुळे जिल्ह्यात आजअखेर केवळ 336 कुष्ठरोगी असून यातही 1 रुग्ण हा विकृत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आह़े राष्ट्रीय कुष्ठरोग निमरूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग विकृती प्रतिबंध व सुधार सेवा शिबिराचे आयोजन करण्यात येणार आह़े आरोग्य सेवा सहायक संचालक कुष्ठरोग कार्यालय आणि अलर्ट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात हा कार्यक्रम राबवण्यात येत आह़े शिबिरात रुग्णांना फिजोओथेरपी, व्ॉक्स बाथ, हाडांचा व्यायाम यासह हवाई चप्पल, गॉगल्स आणि औषधांच्या किटचे वाटप करण्यात येणार आह़े या शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, निमवैद्यकीय अधिकारी, कुष्ठरोग तंत्रज्ञ, आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका, आशा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधनिर्माण अधिकारी हे मार्गदर्शन करून रुग्णांची शुश्रूषा करणार आहेत़ या शिबिरांद्वारे जिल्ह्यातील कुष्ठरोगींमधील विकृतीचे प्रमाण कमी करून त्यांना मानाचे स्थान देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आह़े याअंतर्गत धनराट, उमराण, डोगेगाव, ता़ नवापूर, धनाजे, चुलवड, तलई, ता़ धडगाव तर खापर, मोरंबा आणि काठी, ता़ अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जून ते ऑक्टोबर 2018 या काळात हे शिबिर होऊन मागर्दर्शन करण्यात येणार आह़े जिल्ह्यात दरवर्षी कुष्ठरोगींच्या अॅक्शन प्लॅनसोबतच त्यांना वर्षभर सेवा देता यावी म्हणून सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ तालुकास्तरावर सहा ठिकाणी हे केंद्र सुरू आहेत़ आठवडे बाजाराच्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील या सहाय्यता केंद्रात रुग्णांना सर्व प्रकारच्या सेवा कुष्ठरोग कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत़  तालुकास्तरावर असलेल्या केंद्रांमधून सातत्याने देण्यात आलेल्या सेवेमुळे जिल्ह्यातील कुष्ठरोगींच्या संख्येत घट आली आह़े 2017-18 या वर्षात 551 कुष्ठरोगी सव्रेक्षणातून समोर आले होत़े त्यांच्यावर केंद्रांमधून झालेल्या उपचारांमुळे त्यांच्या संख्येत घट येऊन आजअखेरीस जिल्ह्यात केवळ 336 रुग्ण आहेत़ त्यांच्यातील कुष्ठरोगाची शक्यता ही केवळ 33़75 टक्के असल्याचे उपचारांवरून निष्पन्न झाले आह़े एकीकडे कुष्ठरोगींची संख्या कमी होऊन त्यांच्यातील शारीरिक व्याधी बरी होत असताना दुसरीकडे विकृत रुग्णांची संख्या केवळ 1 असल्याचे स्पष्ट झाले आह़े 100 टक्के विकृती असलेल्या रुग्णावर वडाळा येथे शस्त्रक्रिया करून त्याचे पुनवर्सन करण्यात येणार आह़े