लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील देसाईपुरा भागात जुगार खेळणाºया तिघांवी पोलीसांनी कारवाई केली़ रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़सचिन भिका मराठे, गणेश ईश्वर मराठे दोघे रा़ मराठा गल्ली व राहुल गुलाब माळी हे तिघेही पोलीसांना देसाईपुरा भागातील जनकल्याण रक्तपेढीच्या समोरील गल्लीत आडोशाला पत्ते खेळत असताना दिसून आले होते़ तिघांना ताब्यात घेत पोलींसानी त्यांच्याकडून ३ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ दरम्यान तिघांनाही मास्क लावला नसल्याचेही दिसून आले़ याबाबत पोलीस उपनिरीक्षक प्रविण महाले यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
देसाईपुरा भागात जुगार खेळणाऱ्या तिघांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 21:51 IST