शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

एका महिन्यात २१० आकडेबहाद्दरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागाने गेल्या एका महिन्यात आकडी टाकून वीज चोरी करणाऱ्या २१० ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागाने गेल्या एका महिन्यात आकडी टाकून वीज चोरी करणाऱ्या २१० जणांवर कारवाई केली़ कंपनीने सातत्याने केलेल्या कारवायांमुळे वीज चोरी कमी झाल्याचा दावा केला असून येत्या काळातही कारवाई सुरु राहणार असल्याने वीज चोरांंचे धाबे दणाणले आहे़वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागात धडगाव, तळोदा, अक्कलकुवा आणि शहादा हे चार तालुके समाविष्ट आहेत़ येथील तब्बल ६७ हजार ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत़ गेल्या काही वर्षात वीज चोरीवर आळा घालण्यासाठी कंपनीकडून वेळावेळी गावांमध्ये भेटी देऊन वीज जोडणी घेण्याबाबत आवाहन केले जात आहे़ यानंतरही काही ठिकाणी वीज चोरीचे प्रकार उघडकीस येत असल्याने कंपनीकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे़ यातून दंडाची वसुली करुन वीज चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे़ या कारवाईमुळे चारही तालुक्यातील वीज गळती कमी होऊन समतोल दाबाने वीज पुरवठा करण्यात येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे़ एकीकडे कारवाई सुरु असताना घरगुती आणि कृषीपंपांच्या थकबाकीबाबतही कंपनीकडून कारवाई होण्याचे संकेत देण्यात आले आहेत़तत्कालीन सरकारने कृषी क्षेत्रात वापरल्या गेलेल्या वीज बिलाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता़ हा निर्णय काही कालावधीपुरताच होता़ यामुळे येत्या काही दिवसात कृषीपंपांच्या वसुलीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे़ यातून ुपुन्हा शेतकरी आणि वीज कंपनी असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत़ यावर तोडगा म्हणून शासनाने शेतकऱ्यांकडे थकीत असलेले वीज बिल माफीची कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे़४कंपनीने १ ते ३१ जानेवारी दरम्यान शहादा विभागात २१० जणांवर कारवाई करुन ३५ लाख रुपयांचा दंडही वसुल केला आहे़ दरम्यान २०१९ च्या अंतिम सहा महिन्यात कंपनीने १ हजार ३७५ जणांवर कारवाई करुन तब्बल दोन कोटी रुपयांची वसुली केल्याची माहिती देण्यात आली आहे़ दिवसेंदिवस कारवाईचा वेग वाढत असल्याने चारही तालुक्यातील वीज गळती कमी झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे़४चारही तालुक्यांमध्ये तब्बल ६७ हजार घरगुती ग्राहक आहेत़ यातील किमान २० हजार ग्राहकांकडे तीन ते चार कोटी रुपयांची वीज थकबाकी आहे़ दीर्घमुदत थकबाकीची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी कंपनीकडून यंदा थकबाकीदारांच्या भेटी घेऊन वसुलीसाठी प्रयत्न सुरु आहेत़ कारवाई करुन वसुली करण्यापेक्षा कंपनीकडून सांमजस्याने वसुली करण्यावर अधिक भर दिला जात आहे़४विभागातील चार तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य त्या क्षमतेचे ट्रान्सफार्मर देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याची माहितीही कंपनीने दिली आहे़ विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यात चारही तालुक्यातील कोणत्याही गावात ब्लॅक आऊटसारखे प्रकार घडलेला नसल्याचाही दावा त्यांच्याकडून केला जात आहे़४एकीकडे घरगुती वीज चोरी करणाºयांवर कारवाई होत असताना २६ हजार ७७५ कृषीपंप धारकांच्या अडचणींकडे लक्ष देण्याची मागणी आहे़ शहादा विभागात कृषीपंपधारकांकडे तब्बल ४१२ कोटी रुपयांचे वीजबील थकीत आहे़ या थकबाकीसाठी कंपनी प्रयत्नशील आहे़ परंतू शेतकºयांनी दीर्घकाळापासून असलेली ही बिले अंदाजित असल्याने शासनाकडून बिलांना माफी देण्यात यावी असा आग्रह धरला आहे़ शहादा आणि तळोदा या दोन तालुक्यातील बागायत शेतकºयांना गेल्या काही वर्षात अंदाजित बिले दिल्यामुळे त्यांच्याकडील थकबाकीचा आकडा हा फुगला आहे़ कंपनीकडे शेतकºयांनी काही अंशी भरणा केला असला तरी पुन्हा तीच गत झाल्याने आकडे फुगल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़