लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र फिटनेस सर्टिफिकेट न घेणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. १४ वाहने जप्त करण्यात आले आहेत.न्यायालयाने मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाºया अवजड वाहनांना योग्यता प्रमाणपत्र दरवर्षी घेणे बंधनकारक केले आहे. असे प्रमाणपत्र न घेणाºया वाहनावर कारवाई करण्याचे आदेश परिवहन विभागाला दिले आहेत या आदेशानुसार आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक अनिल केदार नितीन सूर्यवंशी व अजय चौधरी यांनी शहादा प्रकाशा रस्त्यावर कारवाईला सुरुवात केली या कारवाईदरम्यान १४ वाहन चालक व मालकांकडे योग्यता प्रमाणपत्र मिळाले नसल्याने सदर वाहने ताब्यात घेऊन त्यांना पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. ही कारवाई महिनाभर सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
शहाद्यात १४ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 13:10 IST