शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील लांबोळा गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने पर्यायी कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील लांबोळा गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने पर्यायी कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र या पर्यायी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कापसाच्या गाठी वाहून नेणारा ट्रक उलटून अपघात झााला.कोळदा ते खेतिया रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने ठिकठिकाणी पर्यायी कच्चे रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र या पर्यायी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे रुंदीकरणाच्या कामाला गती देण्याची गरज आहे. प्रकाशापासून ते करजई गावापर्यंत तर रस्त्यावर ठिकठिकाणी चढ-उतार तयार झाले आहेत. या रस्त्यावरुन दुचाकी वाहन चालविण्यासाठी कसरत करावी लागते तर अवजड वाहन चालकांची काय अवस्था होत असेल. शिवाय पर्यायी रस्ते कच्चे असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने वाहनधारकांसह त्या त्या गावाच्या नागरिकांचा आरोग्यासाठी घातक ठरत आहे. धुळीमुळे दुपारच्या वेळेस तर समोरुन येणारे वाहनही दिसत नाही. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे वाहनधारकांना हा त्रास सहन करावा लागत असून दररोज लहान मोठे दोनपेक्षा जास्त अपघात या मार्गावर होत आहेत.सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अकोला येथून कापसाच्या गाठी भरुन जाणारा ट्रक (क्रमांक जे.जी.१० एक्स- ७४४९) लांबोळा गावाजवळील पर्यायी रस्त्यावरुन जात होते. या रस्त्यावरील खड्ड्यात ट्रक आदळल्याने तो उलटला. या अपघातात कुठलीही जिवीतहानी अगर गंभीर जखमी झाले नसले तरी ट्रकचे व कापसाच्या गाठींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूकही काही वेळ ठप्प झाल्याने इतर वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला.या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने कोळदा ते खेतिया मार्गावर तीन वर्षापासून वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पर्यायी रस्ते योग्य नसल्याने अपघातही वाढले आहेत. तीन-चार किलोमीटरच्या अंतरावर जागोजागी अपूर्ण काम असल्याने वाहन चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळेही अपघात वाढले आहेत. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग देण्याची मागणी त्रस्त वाहनधारकांकडून होत आहे.