शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

रस्ता खचल्यामुळे ट्रक उलटून अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:34 PM

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा ते खापर दरम्यान जामली फाटय़ाजवळील फरशी पुलाचा भराव व रस्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा ते खापर दरम्यान जामली फाटय़ाजवळील फरशी पुलाचा भराव व रस्ता खचल्यामुळे कपडय़ांच्या गाठी वाहून नेणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. रस्त्याच्या दूरवस्थेमुळे या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, मालेगाव येथून राजस्थानमधील बलोत्रा येथे कपडय़ांच्या गाठी घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच. 18 बीजे- 4156) बुधवारी  दुपारी 12 वाजेच्या सुमारास नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा ते खापर दरम्यान जामली फाटय़ाच्यापुढे अक्कलकुवाच्या दिशेने असणा:या फरशी पुलाजवळ आला. त्याचवेळी समोरून  अवजड सामग्री घेऊन जाणारे कंटेनर आले. फरशी पुलावरून ट्रक व कंटेनर एकाचवेळी निघू न शकत असल्याने चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला. त्याचवेळी फरशी पुलाच्या कडेला असणारा रस्ता व भराव खचला. त्यामुळे हा ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटला. ट्रक उलटल्याने ट्रकमधील कापडाच्या गाठी बाहेर फेकल्या जाऊन त्यांचे नुकसान झाले. या अपघातात मोठी जीवितहानी झाली असती. ट्रक चालक परशुराम नेमकर व सहचालक किरण मासुळे यांना मुका मार लागून ते किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र या अपघातात ट्रकचे व त्यातील कापडाचे मोठे नुकसान झाले. गुरुवारी सकाळी क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्याचे प्रय} करण्यात आले.नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड वाताहत झाली असून रत्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्याच्या दूरवस्थेमुळे शेवाळी-नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावर तळोदा ते अंकलेश्वर्पयत अपघाताची मालिका सुरू आहे. शनिवारी रस्त्यावरील खड्डय़ांमुळे औरंगाबाद-अहमदाबाद बस चालकाचे नियंत्रण सुटून खड्डय़ात उतरली होती. हे खड्डे मातीने बुजविण्यात आल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरते. भरधाव वेगाने धावणारी अनियंत्रित व ओव्हरलोड वाहने त्यातच धुळीचे व खड्डय़ांचे साम्राज्य यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक जीवघेणी बनली आहे. मात्र संबंधित विभागाने या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे.