दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके आदी उपस्थित होते. डॉ. भारूड म्हणाले, लसीकरण पथकांची संख्या वाढविण्यात यावी, त्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, लसीकरण वाढविण्यासाठी परिसरातील स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात यावे.
ग्रामीण भागात फिरत्या पथकांचा अधिक उपयोग करण्यात यावा. कमी लसीकरण असलेल्या गावांवर लक्ष केंद्रित करावे. अशा गावातील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, कोतवाल यांचे सहकार्य घेण्यात यावे. कोरोना चाचण्यांची संख्यादेखील वाढवावी. आरटीपीसीआर चाचण्यांवर अधिक भर द्यावा. रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.