लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑन लाईन पोर्टल दोन दिवसांपासून बंदच असल्यामुळे विद्याथ्र्याचे हाल होत आहेत. शहादा येथील डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू करण्यात आलेले सेतू सुविधा केंद्रात दोन दिवसांपाूसन विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी होत आहे. दिवसभर थांबून विद्याथ्र्याना परतावे लागत आहे. तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष, कृषी शिक्षण, मत्स्य व दुग्ध, कला शिक्षण या विभागामार्फत असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक परीक्षा घेतली जाते. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. विद्याथ्र्यानी नोंदणी केल्यानंतर पोर्टलवर कागदपत्रे सादर करावयाची असतात. त्याची पडताळणी सेतू केंद्रात होते. अशा प्रकारचे सेतू केंद्र जिल्ह्यातील विद्याथ्र्याकरीता शहादा येथील डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत 7 जूनपासून विद्याथ्र्यानी महासेट या संकेतस्थळावर जाऊन विहित लिंकवर नोंदणी केली आहे. नोंदणीननंतर स्वत: निवडलेल्या सेतू सुविधा केंद्रामध्ये पूर्वनियोजित वेळेत विद्यार्थी जात असले तरी पोर्टल सुरूच होत नसल्यामुळे विद्याथ्र्याचे ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी करणे यासह इतर प्रक्रिया ठप्प पडल्या आहेत. या सर्व प्रक्रिया ‘सार पोर्टल’वर करण्यात येतात.सोमवारी थोडेफार कामकाज झाले. मंगळवारी तर पुर्ण दिवस पोर्टल बंद होते. बुधवारी सुरू होईल अशी अपेक्षा होती. परंतु बुधवारी देखील ते बंदच राहिले. दिवसभर विद्यार्थी व पालक थांबून परत जात आहेत. यामुळे प्रचंड मानसिक त्रासाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. मुदत वाढवून मिळणार असली तरी आता होणा:या त्रासाला कंटाळले आहेत. केंद्रात 30 संगणक संच उपलब्ध करून देण्यात आले असून आठ स्कॅनर आणि चार प्रिंटरची व्यवस्थाही करून देण्यात आली आहे. या केंद्राचे समन्वयक म्हणून प्रा.विजय पाटील व प्रा.चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात केवळ याच महाविद्यालयात एव्हढी सुविधा असल्याने येथे केंद्र मंजुर करण्यात आले आहे. याशिवाय अक्कलकुवा येथील जामिया इन्स्टीटय़ूटमध्येही अशा प्रकारचे सेतू केंद्र मंजुर असले तरी तेथे सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे समजते. दरम्यान, विद्यार्थी व पालकांनी निर्धारित वेळेतच केंद्रात यावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
सार’ पोर्टलपुढे विद्याथ्र्याची हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 12:54 IST