शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रामपूर येथील आवास योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी सरपंचासह दाेघांविरोधात गुन्हा दाखल

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: July 19, 2023 18:41 IST

अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर येथील ग्रामपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल झाला.

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर येथील ग्रामपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल झाला. मूळ लाभार्थींऐवजी इतर लाभार्थींना घरकूल मंजूर करत रक्कम लाटण्याचा हा प्रकार आहे. मंगळवारी याप्रकरणी आमदार आमशा पाडवी यांनी रास्ता रोको केल्यानंतर सरपंच, ग्रामसेवक आणि रोजगार सेवक या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.तत्कालीन सरपंच कौशल्या दिलवरसिंग वळवी (४५), तत्कालीन ग्रामसेवक आनंदा ओजना पाडवी (५०) व ग्राम रोजगार सेवक शांताराम चमाऱ्या पाडवी (२८) या तिघांनी २०१९-२०२० या काळात रामपूर ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे मूळ लाभार्थी एस. जी. वळवी यांच्या नावाने आलेले १ लाख २० हजार रुपये परस्पर रामपूर येथीलच प्रतापसिंग आतऱ्या वळवी यांच्या नावावर वर्ग केले होते.

 यासोबतच इतर लाभार्थींच्या अनुदानाची रक्कम अशाप्रकारे इतरांच्या खात्यात वर्ग करून काढून घेण्यात आली होती. दरम्यान तिघांनी संगनमत करून एकाच कुटुंबात दोन किंवा त्यापेक्षा अधिक जणांना लाभ दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ग्रामस्थांकडून पंचायत समितीकडे तक्रारी देण्यात आल्या होत्या. यातून विधान परिषद सदस्य आमश्या फुलजी पाडवी यांनी मंगळवारी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत रास्ता रोको केले होते.  याप्रकरणी गटविकास अधिकारी लालू जेगता पावरा यांनी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन सरपंच कौशल्या दिलवरसिंग वळवी (४५), तत्कालीन ग्रामसेवक आनंदा ओजना पाडवी (५०) व ग्राम रोजगार सेवक शांताराम चमाऱ्या पाडवी (२८) या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :nandurbar-acनंदुरबार