शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार ग्राहक तक्रार केंद्रात अकरा वर्षात 801 प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 12:08 IST

ग्राहक तक्रार निवारण : ग्राहकांमध्ये जागृकता निर्माण व्हावी

लोकमत ऑनलाईननंदुरबार : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडून गेल्या अकरा वर्षात 801 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत़ तर, 147 प्रकरणे आजतागायत प्रलंबित आह़े या दरम्यान, तक्रार निवारण केंद्राकडे एकूण 948 प्रकरणे दाखल करण्यात आली होती़ दरम्यान, ग्राहकांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात अजूनही आपले अधिकार, हक्क याबाबत जागृकता निर्माण झाली नसल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आह़े एखादी वस्तू खरेदी करताना फसवणूक झाल्यास याबाबत तक्रार कोठे करावी याचीही अनेकांना माहिती नसल्याचे या वेळी सांगण्यात आल़े त्यामुळे ग्राहक मंचाबाबत अधिक व व्यापक प्रमाणात जनजागृती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे 2010 मध्ये 61, 2011 - 55, 2012 - 53, 2013 - 48, 2014 - 46, 2015 - 82, 2016 - 71, 2017 - 81 तर 2018 मध्ये फेब्रुवारीर्पयत 63 प्रकरणे दाखल करण्यात आले आहेत़ त्याचप्रमाणे 2006 ते आतार्पयत बँकींग क्षेत्र म्हणजेच पतपेढी, बँका, पतसंस्था आदींसदर्भात 411 पैकी, 375 प्रकरणे निकाली काढण्यात आले तर 36 प्रलंबित आहेत़ विमा प्रकरणातील 154 पैकी 123 प्रकरणे निकाली तर 31 प्रलंबित आहेत़ इलेक्ट्रीसीटी प्रकरणातील 49 पैकी 39 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून 10 प्रकरणे प्रलंबित आहेत़ आरोग्य विभागासंदर्भातील 12 पैकी 10 प्रकरणे निकाली काढण्यात आली तर 2 प्रकरणे प्रलंबित आहेत़ अन्य प्रकारांमध्ये 232 प्रकरणांपैकी 215 प्रकरणे निकाली तर 17 प्रलंबित आहेत़