शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सीडबॉलच्या माध्यमातून 80 हजार बिजांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 13:17 IST

व्हीएसजीएमचा उपक्रम : जलमंदिर पूजनाबरोबरच वृक्षारोपणाला गती

<p>नंदुरबार : दुष्काळावर मात करण्यासाठी जलमंदिरांची अर्थात (गावतलाव) निर्मिती केली पण पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाची चळवळही हाती घेण्यात आली आहे. विशेषत: सीडबॉलचा उपक्रम गावोगावी राबवला जात असून त्या माध्यमातून यंदा 80 हजार बिजे रोवण्याचा          प्रयत्न असल्याची माहिती विविध शहर ग्राम गुजर मंडळ अर्थात व्हीएसजीएमचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी दिली.करणखेडा, ता.नंदुरबार येथे जलमंदिराच्या पूजनानिमित्त सीडबॉलचा उपक्रम राबविण्यात आला. याठिकाणी 500 सीडबॉल वाटप करण्यात आले असून त्याचे रोपण करण्यात येणार आहे. या वेळी आर्ट ऑफ लिव्हींगचे किशोर पाटील, अनिल विठ्ठल पाटील, नरेंद्र पाटील, शीतल पाटील,  कृषीभूषण पाटीलभाऊ माळी, हरी पाटील, माधव पाटील, विनोद पाटील, दीपक पाटील, बळीराम पाटील, छोटू  पाटील, प्रशांत पाटील, कल्याण पाटील, दिलीप पाटील आदी उपस्थित होते. या वेळी कृष्णा पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, व्हीएसजीएमतर्फे र्सवकष शाश्वत विकासावर आधारित उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्यावर्षी सीडबॉलचा उपक्रम यशस्वी            झाला. विशेष खत, मातीचा वापर करून हे सीडबॉल तयार करण्यात आले आहेत. ते पडीक जागेवर           कुठेही फेकले तरी त्यातील रोप उगवतील. त्यामुळे 1600 गावांमध्ये प्रत्येकी 500 सीडबॉल वाटप करण्याचा उपक्रम सुरू आहे. यापूर्वी गावोगावी श्रमदानातून व लोकवर्गणीतून जलमंदिरांची           निर्मिती करण्यात आली आहे. ही जलमंदिरे सध्या पाण्याने भरली असून त्यामुळे गावोगावी लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा उत्साह टिकून रहावा व त्या माध्यमातून भविष्यातील संकटांवर मात करता यावी यासाठी वृक्षारोपणाची चळवळही सुरू आहे. जलमंदिरांच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात          येणार आहे. याशिवाय किमान             दोन एकर शेती असलेल्या  शेतक:यांना आपल्या बांधावर 20 झाडे लावावीत हा उपक्रमही  लवकरच हाती घेणार असून त्याची जनजागृती सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी किशोर पाटील व अनिल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला गुजरजांबोली, भवाली, अडछी, नळवे, करजकुपे, सुंदरदे, करणखेडा आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.