लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात दिवसभरात एकुण ८० कोरोना रुग्ण आढळून आले. गेल्या दोन दिवसांपासून ५० च्या आत रुग्ण संख्या राहत होती. बुधवारी मात्र ही संख्या ८० च्या घरात गेल्याने एकुण रुग्ण संख्या आता पाच हजार १४६ इतकी झाली आहे.नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढतच आहे. स्वॅब चाचण्या वाढविण्यात आल्याने रुग्ण संख्या देखील वाढत असल्याचे चित्र आहे. अनेक रुग्णांना कुठलेही लक्षणे नसतांना त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येत असल्यामुळे असे रुग्ण घरीच आयशोलेशन होत आहेत.सद्या जिल्ह्यात एकुण ७७९ रुग्ण उपचार घेत आहेत. अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. पूर्वी सव्वा ते दीड हजार अॅक्टिव्ह रुग्ण राहत होते. जिल्ह्यात बुधवारी एकुण ८० रुग्ण आढळून आले. तीन टप्प्यात जाहीर करण्यात आलेल्या चाचणी अहवालांमध्ये हे रुग्ण आढळून आले आहेत.
दिवसभरात आढळले ८० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 12:09 IST