लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 16 : आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना 25 टक्के आरक्षणाअंतर्गत देण्यात येणा:या प्रवेशासाठी 13 रोजी शेवटची मुदत होती. याअंतर्गत पहिल्या फेरीत जिल्ह्यातील 72 बालकांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहे. आता 13 एप्रिलनंतर आणखी दोन फे:या होऊन प्रवेश निश्चिती होणार आहे. प्रवेश देण्यासाठी अनेक शाळा हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे. विद्याथ्र्याच्या प्रवेशाच्या रक्कमेचे अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे संस्थाचालक नाखुश आहेत.आर्थिक दुर्बल घटकातील बालकांनाही दज्रेदार शिक्षण मिळावे यासाठी आरटीईअंतर्गत खाजगी व अनुदानीत शिक्षण संस्थांमध्ये 25 टक्के प्रवेश हे आरक्षीत करण्यात आले आहेत. यंदा ऑनलाईन अजर्आपल्या पाल्याला चांगलीत चांगली शाळा मिळावी यासाठी पालकांकडून अर्ज भरतांना अशा शाळांची नोंद करावी लागते. त्यासाठी आतरयत वरिष्ठ अधिका:यांकडे देखील तगादा लावला जात होता. परंतु यंदा शासनाने असे अर्ज ऑनलाईन भरण्याची सक्ती यंदा केली होती. त्यामुळे पालकांना पारदर्शकपणे आपल्या आवडीच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून घेण्यासाठी फारशी कसरत होत नसल्याचे चित्र आहे. ऑनलाईन अर्जात एका शाळेत प्रवेश क्षमतेच्या अधीक अर्ज आले असल्यास त्या ठिकाणी ड्रॉ काढून विद्यार्थी निवडले जात आहेत. पहिल्या फेरीत ही पक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात आली.अचानक मुदतवाढया प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार प्रवेशाचा पहिला टप्पा पार पडत असतांना 16 मार्च रोजी शासनाने यासाठी मुदतवाढ दिली. 13 एप्रिल ही ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची मुदत देण्यात आली होती. पहिल्या मुदतीत 300 पेक्षा अधीक पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज भरले होते.टाळाटाळ..25 टक्के आरक्षीत जागेवर ज्या विद्याथ्र्याना प्रवेश दिला जातो. त्या विद्याथ्र्याची शासकीय नियमानुसारचे शैक्षणिक शुल्क हे शासन भरत असते. परंतु शासकीय शुल्क अगदीच नगण्य असते. याउलट इतर पालकांकडून अशा संस्थांना भरमसाठ शुल्क मिळत असते. शिवाय शासनाकडून येणा:या शुल्काची रक्कम देखील वेळेवर मिळत नाही. त्यामुळे संस्थाचालक प्रवेशांबाबत नाखुश असतात.नामांकित शाळांना पसंतीपालकांकडून नामांकित शाळांनाच सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येते. त्यामुळे एका शाळेसाठी प्रवेश संख्या निश्चितीपेक्षा अधीक अर्ज येत असतात. नंदुरबारातील एका शाळेत केवळ 15 प्रवेशसंख्या असतांना त्या ठिकाणासाठी तब्बल 85 अर्ज आले होते. त्यामुळे अशा ठिकाणी सोडतद्वारे प्रवेश निश्चिती केली जाते. पहिल्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया केल्यानंतर शासनाकडून मुदतवाढीचा आदेश आल्यामुळे पालक संभ्रमात होते. परंतु पहिल्या टप्प्यातील झालेली प्रवेश निवड प्रक्रिया कायम राहणार आहे. त्याव्यतिरिक्त ही प्रक्रिया राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
25 टक्के आरक्षणात 72 जणांना प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 13:01 IST