शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील 71 ग्रामपंचायतीत नवीन प्रभाग रचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 12:59 IST

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 24 : ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 या काळात मुदत संपणा:या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमासाठी नवीन प्रभाग रचना आणि आरक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आह़े निवडणूक आयोगाने यासंदर्भातील वेळापत्रक जाहिर केले असून 18 जूनपासून या प्रक्रियेला सुरूवात करण्यात येणार आह़े या प्रक्रियेत जिल्ह्यातील 71 ग्रामपंचायती समाविष्ट आहेत़ मंगळवारी रात्री ...

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 24 : ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 या काळात मुदत संपणा:या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमासाठी नवीन प्रभाग रचना आणि आरक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आह़े निवडणूक आयोगाने यासंदर्भातील वेळापत्रक जाहिर केले असून 18 जूनपासून या प्रक्रियेला सुरूवात करण्यात येणार आह़े या प्रक्रियेत जिल्ह्यातील 71 ग्रामपंचायती समाविष्ट आहेत़ मंगळवारी रात्री उशिर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना आणि आरक्षण कार्यक्रम जाहिर केला आह़े यानुसार 18 जून पासून त्या-त्या तालुक्यातील तहसीलदार यांनी गुगल मॅपवर एमआरएसएसीचे नकाशे सुपर इम्पोस करून नकाशे अंतिम करणे, 25 जून र्पयत तलाठी, ग्रामसेवक यांनी स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे, सिमा निश्चिती, अनुसुचित जाती व जमाती यांचे आरक्षण निश्चित करणे, 30 जून र्पयत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देणे व सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करणे, 7 जुलै र्पयत त्या-त्या गावातील ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिका:याच्या अध्यक्षतेखाली प्रारूप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढणे, 11 जुलैर्पयत नमुना ब प्रसिद्ध करण्यापूर्वी तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाने असे प्रस्ताव प्राप्त करून त्याची संक्षिप्त प्राथमिक तपासणी करणे व त्यात आवश्यक असल्यास दुरूस्त्या करणे तर 12 जुलै र्पयत या दुरूस्त्या अंतभरूत करून प्रारूप प्रभाग रचना व आरक्षणाला तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता द्यावी व समितीच्या सर्व सदस्यांनी सही करावी असे सुचवण्यात आले आह़े प्रारूप प्रभाग रचनेवर ग्रामस्थांना हरकती व सूचना करता येणार आहेत़ यानुसार 13 जुलैर्पयत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून जाहिर सूचना करण्यात यावी, 20 जुलैर्पयत हरकती सादर करता येतील, 21 जुलैर्पयत प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येतील तर वेळापत्रकानुसार 31 जुलैर्पयत उपविभागीय अधिकारी हरकतींवर सुनावणी घेणार आहेत़ प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबर 2019 र्पयत या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात येणार आह़े