शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलसाठी अॅप असताना 70 हजार अर्ज विक्री, जि.प.सभेत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 13:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेतर्फे राबवण्यात येणा:या घरकुल योजनेची माहिती मोबाईल अॅपद्वारे भरली जात असताना लाभार्थीकडून ग्रामसेवकांनी छापील अर्ज भरून घेत हजारो रूपये लाटल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केला़ शहादा तालुक्यात तब्बल 70 हजार विक्री करण्यात आल्याचा आरोप सभेत करण्यात आला़ या आरोपामुळे  पदाधिकारी व अधिकारी गोंधळले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेतर्फे राबवण्यात येणा:या घरकुल योजनेची माहिती मोबाईल अॅपद्वारे भरली जात असताना लाभार्थीकडून ग्रामसेवकांनी छापील अर्ज भरून घेत हजारो रूपये लाटल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केला़ शहादा तालुक्यात तब्बल 70 हजार विक्री करण्यात आल्याचा आरोप सभेत करण्यात आला़ या आरोपामुळे  पदाधिकारी व अधिकारी गोंधळले होत़े जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात यंदाच्या कार्याकाळाची शेवटची सभा शुक्रवारी घेण्यात आली़ सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक होत्या़ प्रसंगी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, सभापती हिराबाई पाडवी, लताबाई पाडवी, दत्तू चौरे, आत्माराम बागले, अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष सांगळे उपस्थित होत़े शेवटची सभा असल्याने सभेबाबत जिल्हाभरात उत्सुकता होती़ परंतू तुरळक आरोपांच्या फैरी आणि त्यावर झालेल्या चर्चेमुळे सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली़ प्रारंभी मागील सभेचा आढावा घेण्यात आला़  सभेत आयत्या वेळच्या विषयात चर्चा सदस्यांनी शहादा तालुक्यातील घरकुल योजनांच्या ड यादीचा प्रश्न उपस्थित केला़ यावर स्पष्टीकरण देणा:या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्पाधिकारी संदीप माळोदे यांनी अँड्रॉईड अॅपवरून ग्रामसेवकांनी भरून दिलेल्या माहितीनुसार ड यादी तयार करण्यात आल्याचे सांगितल़े यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज नसल्याचे ते म्हणाले, या उत्तरानंतर सदस्यांनी ग्रामसेवकच लाभार्थीकडून रक्कम उकळत असल्याचा तसेच अर्ज विक्री करत असल्याचा आरोप केला़  यावर उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी चौकशी करण्याबाबत चर्चा करून कारवाई करणार असल्याचे सदस्यांना सांगितल़े सभेच्या शेवटी स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़ आवास योजनांसाठी प्रशासनाने ड यादी मंजूर केली आह़े याव्यतिरिक्त इच्छुकांना लाभ देण्यासाठी ग्रामसभा घेऊन ग्रामसेवक व ग्रामपंचायतीने नावे ही प्रशासनाला सुचवायची आहेत़ त्यानंतर प्रशासन इच्छुकाचे सव्रेक्षण करून लाभ देणार होत़े यात अॅपद्वारे माहिती संकलित होणार होती़ तत्पूर्वीच गावागावांमध्ये घरकुल योजनांसाठी इच्छुकांचे अर्ज भरणे सुरू झाल़े हे अर्ज नेमके आले कुठून असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला़ लाभार्थीना अर्ज विक्री करण्याच्या प्रकाराची शहादा तालुक्यात सर्वाधिक चलती असल्याचा आरोप करण्यात आला आह़े तसेच हे अर्ज विकून ग्रामसेवकच घरकुल योजनांचा धंदा करत असल्याचा गंभीर आरोप सभेत करण्यात आला़ सदस्यांनी मागणी केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत़