लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नवापूर विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पालिकेच्या टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आले. 67 मतदान अधिकारी प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 32 क्षेत्रीय अधिकारी, 370 मतदान केंद्राध्यक्ष, एक हजार आठ मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले असून त्यापैकी 67 मतदान अधिका:यांनी दांडी मारली. निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारत ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केल्या. गैरहजर असलेल्या कर्मचा:यांबाबतचा अहवाल जिल्हाधिका:यांना तातडीने सादर करण्यात आला आहे. प्रशिक्षण वर्गात निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी सर्व मतदान कर्मचा:यांना प्रत्यक्ष मतदानाच्या अगोदर व मतदानावेळी मतदान कर्मचारी यांनी करावयाचे कामांबाबत मार्गदर्शन केले. कर्मचा:यांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनीता ज:हाड, नायब तहसीलदार राजेंद्र नजन उपस्थित त्यांनीही कर्मचा:यांना विविध बाबतीत माहिती दिली. तहसील कार्यालयातील कर्मचारी नागेश चौधरी, मिलिंद निकम, सर्व तलाठी व महसूल कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.
नवापुरात 67 कर्मचा:यांची प्रशिक्षणास दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 12:13 IST