लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी 66 केंद्रांची निर्मिती करण्यात आली आह़े येत्या 21 पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आह़े जिल्ह्यात बारावीसाठी 16 हजार 940 तर दहावीच्या परीक्षेला 21 हजार 246 विद्यार्थी बसणार आहेत़ परीक्षेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक घेण्यात आली होती़ या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक संजय पाटील, शिक्षणाधिकारी डॉ़ राहुल चौधरी, मच्छिंद्र कदम यांच्यासह अधिकारी उपस्थित होत़े यावेळी परीक्षा कालावधीत कॉपी प्रकरण आढळल्यास पर्यवेक्षक, केंद्र संचालक यांच्यावर कारवाई करावी, ङोरॉक्स सेंटर बंद ठेवून कलम 144/2 याची अंमलबजावणी करण्यात यावी, परीक्षा केंद्रावर केवळ नियुक्त कर्मचा:यांनाच प्रवेश दिला जावा, परीक्षा सुरु झाल्याच्या दिड तासानंतर पाणी करणा:यांना परीक्षा दालनात प्रवेश द्यावा, विद्याथ्र्याची पूर्ण झडती घ्यावी, विद्यार्थिनींची तपासणी शिक्षिकांनीच करावी, केंद्र संचालक यांनी परीक्षा केंद्रात कोणाजवळ मोबाईल, पेजर कॅनक्युलेटर, वैयक्तिक लॉगबुक राहणार नाही याची दक्षता घ्यावी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली भरारी पथके निर्माण करावे यासह विविध विषयावंर चर्चा करण्यात आली़ जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांनी अधिका:यांना विविध सूचना करत परीक्षा शांततेत पार पाडण्याचे सांगितल़े
दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी 66 केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 12:02 IST