शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

शिथिलतेनंतर जिल्ह्यात परतले ६० हजार नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातून रोजगारासाठी परजिल्ह्यात तसेच परराज्यात गेलेल्या स्थलांतरीतांचा परतीचा प्रवास अद्यापही सुरु असून आजअखेरीस ६० ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातून रोजगारासाठी परजिल्ह्यात तसेच परराज्यात गेलेल्या स्थलांतरीतांचा परतीचा प्रवास अद्यापही सुरु असून आजअखेरीस ६० हजार नागरिक सर्व सहा तालुक्यात परतले आहेत़ यात प्रामुख्याने ऊसतोड तसेच शेतीकामांसाठी गेलेल्या मजूरांची संख्या अधिक आहे़ या सर्वांना १४ दिवस होमक्वारंटाईन करण्यात आरोग्य विभागाने यश मिळवले आहे़रोजगाराअभावी स्थलांतर हा प्रश्न जिल्ह्याला नवीन नाही़ दिवाळीनंतर आदिवासी बहुल भागातून मोठ्या संख्येने मजूर गुजरात राज्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांकडे गेले होते़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर बहुतांश मजूर हे त्याच ठिकाणी अडकून पडले होते़ एप्रिल महिन्यात काही गोष्टीत शिथिलता मिळाल्यानंतर गुजरात राज्यातील कारखानदारांनी मजूरांना परत पाठवण्यास सुरुवात केली होती़ यातून जिल्ह्यात दर दिवशी किमान १ हजार पेक्षा अधिक मजूर परत होते़ या सर्वांची आरोग्य विभागाने तयार केलेल्या क्वारंटाईन सेंटरसह गावोगावी तपासणी बुथ तयार करुन तपासणी केली आहे़ यात प्रामुख्याने स्क्रिनिंग करुन त्यांना हातावर शिक्के मारुन होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यांसह तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापुर तालुक्याच्या विविध भागात १४ दिवस क्वारंटाईन केलेल्या या मजूरांवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासह मदतीने या सर्वांवर लक्ष ठेवून त्यांच्या नोंदी ठेवल्या होत्या़ यामुळे मोठ्या संख्येने मजूर येऊनही त्यांची माहिती मिळवणे सोपे झाले होते़दुर्गम भागात एप्रिल महिन्याच्या अखेरीपासून परतणारे बरेच मजूर स्वेच्छेने गावाबाहेरच थांबून होते़ हे मजूर १५ दिवस पूर्ण झाल्यानंतर गावांमधील आपआपल्या घरी परतले असल्याची माहिती आहे़४परत आलेल्यात केवळ स्थलांतरीत मजूर नव्हे तर खाजगी नोकरी व व्यवसायानिमित्त महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील मोठ्या शहरांमध्ये रहिवास करणाऱ्यांचाही समावेश आहे़४आजअखेरीस नंदुरबार तालुक्यात २१ हजार ३७५़४नवापुर तालुक्यात ४ हजार ९२५़४तळोदा तालुक्यात ८ हजार ९११़४शहादा तालुका-७ हजार ३०३़४अक्कलकुवा ८ हजार ८६३़४तर धडगाव तालुक्यात ९ हजार ४८५ स्थलांतरीत नागरिकांनी प्रवेश केला होता़४एकूण ६० हजार ८६२ संख्या असलेल्या या नागरिकांच्या क्वारंटाईन केंद्रांसह गावनिहाय स्क्रीनिंग करण्यात आले होते़४अद्यापही परतणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यांची माहिती घेतली जात आहे़४गुजरात राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अडकलेल्या मजूरांना श्रमिक एक्सप्रेसने आणण्याचा प्रयत्नही जिल्ह्यात प्रथमच यशस्वी झाला़ यात एकाच वेळी दीड हजार मजूर आले होते़ या सर्वांच्या तपासण्या व स्क्रिनिंग केले गेले़४जिल्ह्यात परतलेल्या एकाही मजूराला इन्स्टीट्यूशल क्वारंटाईन करण्याची वेळ आलेली नसल्याची माहिती आहे़४गुजरात सीमेवर मध्यरात्री किंवा पहाटे मजूरांना सोडून देण्याचे प्रकार होत होते़ या मजूरांना तळोदा, नंदुरबार, नवापुर या सीमेवरील तालुक्यांच्या क्वारंटाईन सेंटर्समध्ये आणून त्यांची तपासणी करुन त्यांच्या गावांकडे रवाना केले गेले़जिल्ह्यात परत येणाºया मजूरांची तसेच नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे़ आरोग्य कर्मचाºयांना गावोगावी भेटी देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या़ त्यानुसार त्यांनी भेटी देत पतणाºयांची माहिती घेऊन त्याचा आढावा सादर केल्यावर तपासण्या झाल्या आहेत़-डॉ़ एऩडी़बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबाऱ