शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान प्रदर्शनात 60 उपकरणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 12:58 IST

तळोदा तालुका विज्ञान प्रदर्शन : अनंत ज्ञानदिप अनुदानित आश्रमशाळेत आयोजन

तळोदा/कोठार : तळोदा तालुक्यातील कोठार येथील अनंत ज्ञानदिप अनुदानित आश्रमशाळेत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आह़े या प्रदर्शनात साधारणत: 60 उपकरणांची मांडणी करण्यात आली आह़े सदर दोन दिवसीय प्रदर्शनाच्या समारोप उद्या होणार आह़े पंचायत समितीचा शिक्षण विभाग व माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यामाने कोठार ता़ तळोदा येथील अनंत ज्ञानदिप अनुदानित आश्रम शाळेत मंगळवारी तळोदा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आह़े या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ़ शशिकांत वाणी यांच्या हस्ते करण्यात आल़े या प्रसंगी व्यासपीठावर याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तळोदा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डी़ जी़ वसावे, मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष निमेश सूर्यवंशी, न्यू हायस्कुल मुख्याध्यापक अजित टवाळे, कोठारच्या सरपंचा विमलबाई पाडवी, भाजपाचे आनंद सोनार, साईनाथ शिक्षण संस्थेचे सचिव गुलाबराव चव्हाण, निसार मक्राणी, जगन शिंदे, विजयसिंग पावरा, काशीराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते हिरालाल पाडवी, तळोद्याचे माजी उपनगराध्यक्ष सुरेश माळी, भाजपा अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ स्वप्नील बैसाने, फुलसिंग वसावे, लिलावंतीबाई पाडवी, जगन मराठे आदींसह मान्यवर उपस्थित होते.या वेळी मार्गदर्शन करताना डॉ़ वाणी यांनी सांगितले की, 21 व्या शतकाची वाटचाल करीत असताना वैज्ञानिक दृष्टीकोण असलेली पिढी निर्माण होणे महत्वाचे असल्याचे सांगितल़े शिवाय या शतकाचे आव्हान पेलताना विज्ञान विषयाबरोबरच गणित व इंग्रजीदेखील तेवढेच महत्वाचे आह़े यामुळे शिक्षकांनी याबाबत विद्यार्थी घडविण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज असून अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करताना स्वत: पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केल़े केंद्र शासनाच्या अटल तंत्रज्ञान योजनेतून जिल्ह्यांतून नंदुरबार व कोठार या दोन ठिकाणी सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली़ या वेळी शाळांचे मुख्याध्यापक सी़एम़ पाटील, प्राचार्य अजित टवाळे यांनीदेखील मार्गदर्शन केल़े कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तसेच आदर्श शिक्षक निमेश सूर्यवंशी यांनी तर सूत्रसंचालन संस्थेचे समन्वयक प्रा़ अविनाश मराठे यांनी केल़े कार्यक्रमास मुख्याध्यापक सुनील परदेशी, नरेंद्र मराठे, छाया खैरनार, ज्ञानेश्वर पाटील, श्रमा मराठे, केंद्रप्रमुख डी़बी़ पावरा आदींसह विज्ञान शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होत़े या विज्ञान प्रदर्शनात एकूण 60 उपकरणे मांडण्यात आली आहेत़ त्यात, प्राथमिक गटातून 23 तर माध्यमिक गटातून 30  व शिक्षक गटातून 6 अशा उपकरणांचा समावेश आह़े पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने आदिवासी भागातील जास्तीत जास्त विद्याथ्र्यानी विज्ञान प्रदर्शनात सहभागी करुन त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असताना जिल्हा परिषदेच्या एकाही शाळेचे उपकरण प्रदर्शनात दिसून आले नसल्याने याबाबत खंत व्यक्त करण्यात आली़  दरम्यान, या वर्षीच्या तळोदा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी ‘जीवनातील आव्हानांसाठी वैज्ञानिक उपाय’ हा मुख्य विषय होता. या विषयांअंतर्गत कृषी व जैविक शेती, आरोग्य व स्वच्छता, संसाधन व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व दळणवळण संप्रेषण, गणितीय प्रतिकृती हे विषय विद्याथ्र्यांना देण्यात आले होते.या विज्ञान प्रदर्शनात बालवैज्ञानिकांनी केलेल्या साहित्य व प्रतिकृतींची परीक्षण करण्यात येणार आह़े व  बुधवारी विजेत्यांची नावे घोषित करण्यात येतील़ व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम देखील होईल़