शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

मोड गावठाणात 56 कुटूंबांचे पुनवर्सन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील मोड गावठाणात धडगाव तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्पबाधित 56 कुटूंबांचे पुनवर्सन करण्यात येणार आह़े यासाठी देण्यात आलेल्या पाच हेक्टर जमिन सरदार सरोवर प्रकल्प विभागाकडे वर्ग करण्यात आली आह़े  मोड गावालगत असलेल्या या जमिनीचे भूमिपूजन गुरूवारी करण्यात आल़े प्रसंगी पंचायत समितीच्या सभापती शांतीबाई दिवाकर पवार, उपसभापती ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील मोड गावठाणात धडगाव तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्पबाधित 56 कुटूंबांचे पुनवर्सन करण्यात येणार आह़े यासाठी देण्यात आलेल्या पाच हेक्टर जमिन सरदार सरोवर प्रकल्प विभागाकडे वर्ग करण्यात आली आह़े  मोड गावालगत असलेल्या या जमिनीचे भूमिपूजन गुरूवारी करण्यात आल़े प्रसंगी पंचायत समितीच्या सभापती शांतीबाई दिवाकर पवार, उपसभापती दीपक गोरख मोरे, सरदार सरोवर प्रकल्प विभागाचे उपजिल्हाधिकारी सुनिल सूूर्यवंशी, तहसीलदार योगेश चंद्रे, सहायक अभियंता व्ही़एच़खंदारे, मंडळ अधिकारी आऱएऩकोळी, ग्रामविकास अधिकारी शांतीलाल बावा, नर्मदा बचाव आंदोलनाचे नूरजी वसावे, लतिका राजपूत, विजय वळवी, ओरसिंग पटले, तलाठी अरूण धनगर, सुभाष ठाकरे उपस्थित होत़े प्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी पुनवर्सन प्रक्रियेची माहिती दिली़  प्रसंगी नर्मदा बचाव आंदोलनाचे नूरजी वसावे यांनी पाच हेक्टरपेक्षा अधिक जागा शासनाने द्यावी, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितल़े सरपंच जयसिंग माळी यांनी जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांच्या सूचनेनुसार मोड गावामधून जमिन दिल्याची माहिती दिली़ मोड गावालगत असलेल्या या जमिनीवर 39 आदिवासी शेतकरी कुटूंबांकडून पीकपेरा होत होता़ त्यामुळे ही जमिन द्यावी की, न द्यावी याबाबत घालमेल सुरू होती़ परंतू प्रशासनाच्या आग्रहाने आदिवासी बांधवांसाठीच जमिन दिल्याचे माळी यांनी शेवटी सांगितल़े घराची जागा उपलब्ध 56 कुटूंबांचे प्रतिनिधिही या कार्यक्रमास उपस्थित होत़े अनेक वर्षापासून विस्थापन होऊनही निवासाची जागा मिळत नसल्याने त्यांचा संघर्ष सुरू होता़ घराची जागा मिळाल्याने त्यांची समस्या सुटली आह़े