शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

नंदुरबार जिल्ह्यात ५१ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोविड रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटरमधून मंगळवारी दिवसभरात ५१ जणांना घरी सोडण्यात आले़ प्रथमच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोविड रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटरमधून मंगळवारी दिवसभरात ५१ जणांना घरी सोडण्यात आले़ प्रथमच एवढ्या मोेठ्या संख्येने रुग्णांना घरी सोडण्यात आले़ जिल्ह्यात बरे झालेल्यांची संख्या ही ५६० झाली असून २०६ जण उपचार घेत आहेत़मंगळवारी दुपारी १४ जणांना डिस्चार्ज कोविड केअर सेंटर, जिल्हा रुग्णालय येथून डिस्चार्ज देण्यात आला होता़ यानंतर काही कालावधीत पुन्हा ३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला़ दिवसभरात घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ३९ रूग्ण हे नंदुरबार शहर आणि तालुक्यातील आहेत़ तर शहादा येथील ४, तळोदा ३ तर नवापूर येथील एकास डिस्चार्ज देण्यात आला आहे़ गेल्या दोन दिवसात नवीन बाधितांची संख्या समोर आलेली नसली तरी रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे़ जिल्ह्यात आजवर सर्वाधिक ३६९ रुग्ण नंदुरबार, १२२ शहादा, तळोदा ३३, नवापूर १७, अक्कलकुवा १७ तर धडगाव तालुक्यातून एक रुग्ण बरा होवून घरी परत आला आहे़ जिल्ह्यात कोरोनामुळे ४७ आजअखेरीस जणांचा मृत्यू झाला आहे़ जिल्ह्यात आजअखेरीस एकूण ८५९ रूग्ण आढळून आले आहेत़ प्रशासनाने ५ हजार जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते़ यातील ३ हजार ९५० जणांचे स्वॅब अहवाल नेगेटिव्ह तर ८५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते़ जिल्हा रुग्णालयात रॅपिड अँटीजेन आणि ट्रूनेट मशिनद्वारे कोरोना चाचणीची सोय करण्यात आली आहे़ यातून रुग्णांच्या स्वॅब तपासणीला वेग आला आहे़ आजअखेरीस १६९ जणांचे कोरोना अहवाल प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे़ बुधवारी दुपारपर्यंत हे अहवाल समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़